ETV Bharat / bharat

राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना मिळणार तीन दिवसांत ७ लाख लशींचे डोस

author img

By

Published : May 11, 2021, 9:13 PM IST

येत्या तीन दिवसांमध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांना ७ लाख २९ हजार ६१० लशींचे डोस मिळणार आहेत. राज्य व केंद्रशासित प्रदेशांना मोफत लशींचे डोस देऊन देशभरातील लसीकरण मोहिमेला चालना देण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोना लस
कोरोना लस

नवी दिल्ली - राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडे ९० लाखांहून अधिक कोरोना लशींचे डोस आहेत. आणखी ७ लाख डोस तीन दिवसांमध्ये देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्र सरकारने राज्यांना १९ कोटी लशींचे डोस विनाशुल्क दिले आहेत. त्यामध्ये वाया गेलेल्या लशींच्या डोसचाही समावेश आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशाकडे ९० लाख ३१ हजार ६९१ लशींचे डोस आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांना ७ लाख २९ हजार ६१० लशींचे डोस मिळणार आहेत. राज्य व केंद्रशासित प्रदेशांना मोफत लशींचे डोस देऊन देशभरातील लसीकरण मोहिमेला चालना देण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा- उत्तर प्रदेश- गंगा किनारी पुन्हा आढळले १२ जणांचे मृतदेह

कोरोना लसीकरणाची मोहिम तिसऱ्या टप्प्यात १ मे २०२१ पासून सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत दर महिन्याला लस उत्पादनातील ५० टक्के लस केंद्र सरकारकडून खरेदी करण्यात येत आहे.

हेही वाचा-कोरोना लशीचा फॉर्म्यूला सार्वजनिक करावा; अरविंद केजरीवाल यांची केंद्राला विनंती

महाराष्ट्रासह अनेक राज्यांत लशींचा तुटवडा-

महाराष्ट्रात लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात राज्यात लसींचा मोठा तुटवडा आहे. सध्या राज्याला खूप कमी प्रमाणात राज्याला लसी उपलब्ध होत आहेत. त्यातच केंद्र सरकारने राष्ट्रीय लसीकरण मोहीमेत ४५ वयोगटाच्या वरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे राष्ट्रीय लसीकरण मोहीम राज्य सरकार सुरू ठेवणार आहे. या मोहिमेअंतर्गत ४५ वयोगटाच्या वरील पाच लाख लोकांना दुसरा डोस देणे आहे बाकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.