नवी दिल्ली - रशियन कोरोना लस उत्पादक कंपनी स्पूटनिक व्हीने सप्टेंबरमध्ये पूर्ण क्षमतेने उत्पादन करणार असल्याचे जाहीर केले आहे. भारत हा स्पूटनिकच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा हब ठरणार असल्याचे रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) म्हटले आहे.
रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड कंपनीने स्पूटनिकच्या उत्पादनासाठी सीरम, ग्लॅँड फार्मा, हेटेरो बायोफार्मा, पॅनासिया बायोटेक, स्टेलिस बायोफार्मा, व्हर्शो बायोटेक आणि मॉरपेन लॅबोरेटरीज कंपनीबरोबर करार केले आहे आहेत.
हेही वाचा-'हॅलो... हॅलो...' 26 वर्षांपूर्वी भारतात पहिल्यांदा झालं होतं मोबाईलवर बोलणं, वाचा इनसाईड स्टोरी
स्पूटनिक लाईट ऑगस्टमध्ये लाँच होणार-
स्पूटनिकच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची कमतरता असल्याचे रिपोर्ट चुकीचे आहेत. भारतामधील भागीदार कंपन्यांकडून कंपोनंट बॅचेसचे यापूर्वीच उत्पादन घेण्यात आले आहे. स्पूटनिकच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान भारताला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारत आणि रशियामधील लस उत्पादन तज्ज्ञांमध्ये माहितीची देवाण-घेवाण सुरू आहे. आरडीआयएफने स्पूटनिक व्ही आणि स्पूटनिक लाईटचे ऑगस्टमध्ये लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा-जम्मू काश्मीर : पुलवामाच्या हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी एन्काउन्टरमध्ये ठार
या कारणाने स्पूटनिकचे कमी प्रमाण-
रशियामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्पूटनिक व्ही लशींचे डोस येण्यास उशीर होत असल्याचे डॉ. रेड्डीज लॅब कंपनीने म्हटले होते. ऑगस्टमध्ये स्पूटिक व्ही लशींचे उत्पादन वाढू शकते, असेही कंपनीने म्हटले होते.
'स्पूटनिक व्ही'लसीविषयी...
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. देशातील प्रत्येकाला लस मिळावी म्हणून रशियाच्या स्पूटनिक व्ही लसीला देशात मंजुरी देण्यात आली आहे. देशभरातील अपोलो रुग्णालयांमध्ये 'स्पूटनिक व्ही' ही कोरोना लस देण्यात येत आहे. स्पूटनिक व्ही लशीची किंमत अपोलो रुग्णालयात 1 हजार 195 रुपये असणार आहे. स्पूटनिक व्ही लसीची किंमत 995 रुपये आहे. तर वरील 200 रुपये प्रशासन शुल्क आहे.
स्पूटनिक व्ही लशीबाबत महत्त्वाचे मुद्दे -
- 11 ऑगस्ट रोजी जगातील प्रथम कोविड - 19 लसीची नोंदणी करणारा रशिया हा पहिला देश ठरला. रशियाच्या या लसीचे नाव स्पुटनिक व्ही. असून ते रशियाच्या पहिल्या उपग्रहाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
- स्पूटनिक व्ही भारतामध्ये उपलब्ध होणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. यापूर्वी भारताने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.