नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार, अनुपम खेर आणि मनोज वाजपेयी यांची प्रमुख भूमिका असलेला 'स्पेशल 26' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नायक आणि त्याचे सहकारी बनावट इनकम टॅक्स अधिकारी बनून धनाढ्यांच्या घरावर रेड टाकतात. (Fake Income Tax Raid on delhi businessman).
7 जण आयकर विभागाचे अधिकारी बनून आले : या चित्रपटाच्या धर्तीवर आता दिल्लीतील जनकपुरी भागात एका व्यावसायिकाच्या घरी छापा टाकण्यात आला. लिफ्टचा व्यवसाय करणाऱ्या या व्यावसायिकाच्या घरावर 7 जण आयकर विभागाचे अधिकारी बनून छापा टाकण्यासाठी आले होते. या प्रकरणी तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. तर तीन जण अद्याप फरार आहेत. कुलजीत सिंग असे तक्रारदाराचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
काळ्या पैशाबाबत विचारपूस केली : जनकपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील व्यापारी कुलजीत सिंग यांच्या घरी अचानक 7 लोक आले. त्यापैकी एकाने तो दिल्ली पोलिसांचा हेड कॉन्स्टेबल, तर दुसऱ्याने तो आयकर अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी व्यावसायिकाला धमकी देऊन काळ्या पैशाबाबत विचारपूस केली. तसेच त्यांनी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांचीही बराच वेळ चौकशी केली. या दरम्यान या बनावट आयकर पथकाला कोणतीही माहिती न मिळाल्याने सर्वजण माघारी परतले. यानंतर व्यावसायिकाला त्यांचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर जनकपुरी पोलीस ठाणे या प्रकरणाच्या तपासात गुंतले.
तीन जण फरार आहेत : या प्रकरणी पश्चिम जिल्हा पोलिसांचे डीसीपी विचित्रा वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर चार जणांना अटक केली. या घटनेत एकूण 7 जणांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित 3 जणांना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 'आमचे लक्ष त्या लोकांवर आहे जे अद्याप फरार आहेत. त्यांना अटक करणे आवश्यक आहे. त्यांना पकडल्यानंतरच हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे स्पष्ट होईल', असे ते म्हणाले.
हेही वाचा :
- Mumbai Crime News : बँकेची 13 कोटी रुपयांची फसवणूक, सीएसह 9 जणांना तीन वर्षांची शिक्षा
- Thane Crime : शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूकदारांना नऊ कोटीचा गंडा; कल्याणच्या परांजपेला शिर्डीतून घेतले ताब्यात
- Businessman Online Game Cheating: ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून व्यापाऱ्याची फसवणूक; बुकीच्या घरातून करोडोंचे घबाड जप्त