ETV Bharat / bharat

Commonwealth Games 2022 : चहावाल्याच्या मुलाने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मिळवून दिले पहिले पदक; सांगलीत जल्लोष - सांगलीतील चहावाल्याच्या मुलगा संकेत सरगर

सांगलीतील चहावाल्याचा मुलगा वेटलिफ्टर संकेतने ( Weightlifter Sanket Sargar ) भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. 55 किलो वजनी गटात 248 किलो वजन उचलत रौप्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे, त्याचे सुवर्णपदक एक किलोने हुकले.

Sanket Sargar
वेटलिफ्टर संकेत सरगर
author img

By

Published : Jul 30, 2022, 6:08 PM IST

Updated : Aug 12, 2022, 5:28 PM IST

सांगली: सांगलीतील चहावाल्याच्या मुलाने बर्मिंगहॅम ( इंग्लड ) येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. संकेत महादेव सरगरने 55 किलो वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले ( Weightlifter Sanket Sargar won silver medal ) आहे. नुकतेचं तिची बहिण काजल सरगरने खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तिचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केले होते. आता संकेत सरगरचे देखील पंतप्रधानांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

संकेत सरगर याचे वडील महादेव सरगर चहा विक्रेते ( Sanket Sargar father tea seller )आहे.शहरातला संजयनगर या ठिकाणी राहणारे महादेव सरगर यांना तीन मुले असून यातील संकेत हा मोठा मुलगा आहे.सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले. सध्या ते पान टपरी आणि चहा विक्रीचा व्यवसाय करतात. लवली सर्कल या ठिकाणी सरगर यांचे चहा आणि भजी विक्रीचा गाडा आहे. यातून त्यांच्या संसाराचा गाडा चालू आहे. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सरगर दांपत्य राबतात. या जोरावरच सरगर यांनी संकेत व तिची लहान बहिण काजल या दोघांनाही खेळाचे धडे दिले आहेत.

वेटलिफ्टर संकेत सरगरने पदक जिंकल्यानं सांगलीत जलौष

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संकेतने वेटलिफ्टिंगचे धडे घेऊन थेट राष्ट्रकुल स्पर्धेत धडक ( Commonwealth Games 2022 ) दिली. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंग विभागात भारताचे प्रतिनिधित्व करत 55 किलो गटांमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. 248 किलो वजन उचलत संकेतने कॉमनवेल्थ स्पर्धेतलं भारताला पहिलं पदक मिळवून दिले. त्याच्या या विजयानंतर सांगलीमध्ये सरगर कुटुंबाने आणि त्याच्या मित्रपरिवारने जल्लोष साजरा केला आहे.

नुकतेच हरियाणा या ठिकाणी पार पडलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ( Khelo India Youth Games ) संकेतची लहान बहिण काजल हिने सुवर्णपदक पटकावले होते. तिच्या यशाची सर्वत्र चर्चा झाली होती. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'मन की बात'मध्ये काजल सरगर हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचं कौतुक केलं होतं. त्यामुळे लहान बहिणीच्या पाठोपाठ मोठ्या भावाने देखील आई-वडिलांच्या कष्टाची चीज करून दाखवले आहे.

हेही वाचा - Commonwealth Games 2022 : वेटलिफ्टर संकेतने भारताला मिळवून दिले पहिले पदक, दुखापतीमुळे सुवर्णपदक हुकले

Last Updated : Aug 12, 2022, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.