कुपवाडा : उत्तर काश्मीरमधील कुपवारा जिल्ह्यातील एका छावणीत एका सैनिकाने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवले ( Soldier shoots self dead in Kupwara ), अशी माहिती अधिकाऱ्यानी सोमवारी दिली.
सर्व्हिस रायफलने स्वतःवर झाडली गोळी -
पोलिसांकडून मिळालेल्या माहितनूसार, 11 डिसेंबरच्या रात्री शिंदे संदीप अर्जुन नावाचा हवालदार रँकचा सैनिक द्रांग्यारी चौकी बल येथे तैनात होता. तेव्हा त्याने पहाटे साडेचार वाजता स्वत:च्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली, त्याला श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले परंतु जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. असे सांगितले.
हेही वाचा - BJP MLA Asha Patel Passes Away : भाजप महिला आमदार आशा पटेल यांचे निधन; डेंग्यूने घेतळा बळी