ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशात भीषण अपघात; 6 जण ठार तर 7 जण - आंध्र प्रदेश अपघात न्यूज

आंध्र प्रदेशच्या नुझविड येथे रविवारी पहाटे एका लॉरीने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. ऑटोमध्ये चालकासह 12 जण होते. यातील 6 जण जागीच ठार झाले. तर उर्वरित 7 जण जखमी झाले.

अपघात
अपघात
author img

By

Published : Mar 14, 2021, 11:29 AM IST

कृष्णा (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशच्या नुझविड येथे रविवारी पहाटे एका लॉरीने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जण ठार तर सात जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

आज पहाटे चार वाजता गोलापल्ली गावाजवळ एका ट्रकने ऑटोला धडक दिली. ऑटोमध्ये चालकासह 12 जण होते. यातील 6 जण जागीच ठार झाले. तर उर्वरित 7 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी विजयवाडा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दररोज सरासरी 415 जणांचा मृत्यू -

देशातील वेगवेगळ्या भागात सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. रस्ते अपघात आणि त्यातील मृतांची संख्या बघितली तर आपल्या देशात रस्ता सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे जाणवते. सरकारी आकडेवारीनुसार देशात रस्ते अपघातात दररोज सरासरी 415 जणांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी साडेतीन लाखांहून अधिक लोकांना अपघातामुळे कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागते.

रस्ते अपघात हे कोरोनापेक्षाही धोकादायक -

जगातील एकूण रस्ते अपघातांपैकी 6 टक्के अपघात हे भारतात होतात. तर जगभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी 11 टक्के मृत हे भारतातील आहेत. गेल्या 32 वर्षांत देशात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत पाच पट वाढ झाली आहे. रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता 32 वर्षांपूर्वी देशात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळण्यास सुरूवात झाली. मात्र त्यानंतरही रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. रस्ते अपघात हे कोरोनापेक्षाही धोकादायक असल्याची कबुली केंद्राने दिली आहे. मात्र यावर नियंत्रणासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - जामिनानंतर दिशा रवीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...'TRPसाठी न्यूज चॅनलने मला दोषी करार दिला'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.