नवी दिल्ली - दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमधील वादात नव्याने भर पडली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 15 जणांविरोधात खोटे आरोपपत्र दाखल करणे आणि छापे टाकण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली पोलीस, सीबीआय आणि ईडीला केल्याचा दावा उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी केला. ते ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, ज्या 15 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची पंतप्रधानांनी सूचना केली आहे, ते सर्व आम आदमी पक्षाशी संबंधित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जणांची यादी सीबीआय, ईडी आणि दिल्ली पोलिसांना दिली आहे. छापे टाकणे आणि त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे पंतप्रधानांनी त्यांना आदेश देल्याचा दावा सिसोदिया यांनी केला. आगामी निवडणुकीपूर्वी हे काम करण्याची सूचना देण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी हे काम पूर्ण करण्याचे वचन दिल्याचा दावाही सिसोदिया यांनी केला.
हेही वाचा-पंजाबमधील पठाणकोटमध्ये प्रशिक्षणादरम्यान सैन्यदलाच्या जवानाचा मृत्यू, दोन जवान गंभीर
राकेश अस्थाना हे मोदींचे ब्रमाहस्त्र-
राकेश अस्थाना हे मोदी यांचे ब्रम्हास्त्र आहेत. कोणत्याही मार्गाने काम केले जाईल, असे त्यांनी वचन दिले आहे. आप पक्ष हे सत्य आणि प्रामाणिकपणाने राजकारण करते. तुम्ही सीबीआय आणि ईडी पाठवा. आम्ही त्यांचे स्वागत करू.
हेही वाचा-अफगाणिस्तानातून 80 भारतीयांची सुटका; हवाई दलाच्या विमानाने सायंकाळी मायदेशात परतणार
दरम्यान, मोदी सरकारकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याची विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका होते.
हेही वाचा-'तालिबानवर भारत विश्वास ठेवू शकत नाही, wait and watch ची भूमिका घ्यावी' - तज्ञ
दिल्लीला ऑक्सिजन पुरवठा, दिल्लीच्या नायब राज्यपालांना जादा अधिकार आदी मुद्द्यांवरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले होते.