चंदीगड - कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा आज राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. पुढील मुख्यमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची नियुक्ती करण्याच्या कोणत्याही सूचनेला विरोध करणार असल्याचे अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट सांगितले.
कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, की नवज्योतसिंग सिद्धू हे अकार्यक्षम माणूस आहेत. ते मोठे संकट होणार आहेत. पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाला विरोध असणार आहे. त्यांचे पाकिस्तानबरोबर संबंध आहेत. नवज्योतसिंग हे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका असणार आहेत.
हेही वाचा-बाबुल सुप्रियोंंनी बदलले राजकारणाचे सूर; अचानक घेतला तृणमुलमध्ये पक्षप्रवेश
नवज्योत सिद्धू हे इमरान खान यांचे मित्र-
सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान व पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे मित्र आहेत. मी माझ्या देशासाठी पंजाबचे मुख्यमंत्रीपदाकरिता नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावाला विरोध करणार आहेत. हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे.
हेही वाचा-जाणून घ्या, कोण होणार पंजाबचा नवा मुख्यमंत्री, 'ही' तीन नावे चर्चेत
दरम्यान, इमरान खान यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला नवज्योतसिंग सिद्धू यांनी इस्लामाबादमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा सत्ताधारींस विरोधी पक्षांनी हजेरी लावली होती.
राजीमाना दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी दिली प्रतिक्रिया-
काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील वादाला मोठे वळण लागले आहे. काँग्रेसचे हायकमांडने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेत राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले, की मी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो आहे. मी राजीनामा देणार असल्याचे त्यांना स्पष्ट सांगितले. गेल्या काही महिन्यांत असे तिसऱ्यांदा घडले आहे. मला खूप अपमानास्पद वाटत आहे. भविष्यात नेहमीच राजकारणात संधी असतात. त्याबाबत मी माझ्या एकनिष्ठ समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.
हेही वाचा-पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले,...