ETV Bharat / bharat

Karnataka 5 Guarantees : सिद्धरामय्यांनी करून दाखवले! मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दिली पाच हमीपत्रांना मंजुरी

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाचही हमीभावांना मान्यता दिली आहे. पुढील बैठकीत याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले.

SIDDARAMAIAH
सिद्धरामय्या
author img

By

Published : May 20, 2023, 9:25 PM IST

बेंगळुरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच हमीपत्रांना मंजुरी दिली आहे. बैठकीनंतर सिद्धरामय्या म्हणाले की, या हमीपत्रांना तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत यावर पुन्हा चर्चा होऊन त्याची अधिकृत घोषणा केली जाईल. सिद्धरामय्या यांनी आज सकाळी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल : विधानसभेत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, गृह ज्योती योजनेंतर्गत 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. यामुळे सरकारला दरमहा 1,200 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत, आम्ही प्रत्येक कुटुंब प्रमुखाच्या खात्यात 2,000 रुपये जमा करू. अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रत्येक बीपीएल कार्डधारकाला 10 किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महिलांना मोफत बस पास देणार : युवानिधी योजनेंतर्गत, पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेरोजगार असणाऱ्यांना दोन वर्षांसाठी दरमहा 3000 रुपये दिले जातील. दरम्यान, त्यांना खासगी किंवा सरकारी नोकरी मिळाल्यास देयके बंद होतील. कर्नाटकात राहणाऱ्या महिलांना सरकार मोफत बस पास देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पाच प्रकल्पांवर पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करून त्याची अधिकृत अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात पक्षाला सत्तेत आणण्यासाठी काँग्रेसने पाच प्रमुख हमीभाव जाहीर केले होते.

  • #WATCH | There is a huge difference between the promises made by Congress and the announcements made by the CM after the first meeting. The people of Karnataka are disappointed by the announcements made by the CM. I don't think he has taken his decision sincerely: Former… pic.twitter.com/tV0VOPPl9x

    — ANI (@ANI) May 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बोम्मईंनी केली टीका : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मात्र सिद्धरामय्या यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी सिद्धरामय्या यांनी हा निर्णय मनापासून घेतला नसल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसने दिलेली आश्वासने आणि मुख्यमंत्र्यांनी पहिल्या सभेनंतर केलेल्या घोषणा यात मोठी तफावत आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमुळे कर्नाटकातील जनता निराश झाली आहे. त्यांनी आपला निर्णय मनापासून घेतला आहे असे मला वाटत नाही - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi : पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सर्व 5 आश्वासने पूर्ण केली जातील, राहुल गांधींची कर्नाटकच्या जनतेला हमी
  2. Karnataka CM Oath Ceremony : सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
  3. KCR On BRS Model In Country : विकासाचे बीआरएस मॉडेल भारतभर नेणार; बीआरएसने सुरू केली 288 मतदार संघात लढण्याची तयारी - केसीआर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.