मुंबई - ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष एकादशीला अपरा (Apara Ekadashi 2021) तसेच जलक्रीडा एकादशीही म्हणतात. पुसवंत सीमांत या संस्कारांसाठी अपरा एकादशी शुभ मानली जाते. या वर्षी अपरा एकादशी रविवारी ६ जूनला साजरी केली जाणार आहे. अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची उपासना तसेच विष्णू चालीसाचे वाचन केल्यास त्याचा लाभ मिळेल.या दिवशी व्रत केल्यास धनप्राप्ती होईल. कुमारिकेने व्रत केल्यास तिला सुयोग्य साथीदार मिळेल. या दिवशी कोणतेही काम करायचे नाही. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. पुराणात असा समज आहे की, भगवान विष्णू भक्तीने प्रसन्न होऊन सर्व दु:ख दूर करतो.
अपरा एकादशीचे 2021 शुभ मुहूर्त-
अपरा एकादशीचा शुभ मुहूर्त शनिवार 05 जूनला सकाळी 04 वाजून 07 मिनिटांनी सुरू होऊन रविवार 06 जूनला सकाळी 06 वाजून 19 मिनटांनी संपेल. अपरा एकादशी व्रत पारायण करण्यासाठी शुभ मुहूर्त 07 जूनला सकाळी 05 वाजून 12 मिनिटांपासून सकाळी 07 वाजून 59 मिनटांपर्यंत असेल.
एकादशीचे महत्व -
या दिवशी भगवान विष्णुची पूजा करून व्रत ठेवले जाते. अशी श्रध्दा आहे की, या एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्यास आरोग्य प्राप्त होते. तसेच विशेष फळाचीही प्राप्ती होते. विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा केल्यास जीवनात सुख-समृद्धी येईल. यामुळे आयुष्यात सर्व संकटांपासून मुक्तीही मिळेल.