वाराणसी - ज्ञानवापी कॅम्पसमधील शृंगार गौरी प्रकरणाबाबत आयोगाची कार्यवाही सोमवार, १६ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली होती, ती पूर्ण झाली आहे. मात्र, वादी-प्रतिवादी यांच्यासह वकील आयुक्त व इतर अजूनही ज्ञानवापी संकुलात उपस्थित आहेत. वाराणसीचे पोलीस आयुक्त ए सतीश गणेश यांनी सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसराची दोन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 14 व 15 मे नंतर आज तिसऱ्या दिवशी सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण होणार आहे. वाराणसी न्यायालयाने 17 मेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण ( Gyanvapi Masjid Survey ) करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ( shringar gauri gyanvapi masjid survey )
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपर्यंत सर्वेक्षणाचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे सर्वेक्षण दोन तासांत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे फिर्यादीचे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी यांनी सांगितले.
शृंगार गौरी प्रकरणी खटला दाखल करणारे विश्व वैदिक हिंदू महासंघाचे प्रमुख डॉ. हरिशंकर जैन यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी झालेल्या पाहणी प्रक्रियेत रंजक तथ्ये समोर आली आहेत. ज्यामुळे हिंदू पक्षाची बाजू अधिक मजबूत झाली आहे. मशीद प्राधिकरणाच्या आक्षेपानंतरही सर्वेक्षण सुरू ठेवण्याच्या आणि 17 मे पर्यंत अहवाल सादर करण्याच्या वाराणसी दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण केले जात आहे. दिवाणी न्यायालयाने या जागेचे सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी करण्यासाठी कोर्ट कमिशनरची नियुक्ती केली होती. त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ज्याने २१ एप्रिल रोजी अपील फेटाळून लावले होते. उच्च न्यायालयाच्या २१ एप्रिलच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पाच महिलांनी शृंगार गौरीच्या दैनंदिन पूजेला परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. जे काशी विश्वनाथ मंदिर होते ते ज्ञानवापी मशिदीच्या आवारात वसले असल्याचा दावा केला जातो आहे.
सहाय्यक वकील आयुक्त करत आहेत सर्वेक्षण - सहाय्यक वकील आयुक्तपदी नियुक्त झालेले विशाल सिंग हे आवारात दाखल झाले आहेत. बहुधा आज ही कारवाई संपुष्टात येईल, असे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. 8:00 ते 12:00 पर्यंत वेळ निश्चित करण्यात आली आहे. यावेळी न्यायालयाच्या बाजूनेच कारवाई केली जाईल. प्रशासनाचे पूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकारी यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. आत काय सापडले आणि कसे सापडले याची माहिती देणे योग्य नाही. तळघर पाण्याने भरले आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की, ज्या वस्तू तेथे होत्या, त्याच होत्या. आज कारवाई कुठे होणार? या प्रश्नावर ते म्हणाले की, वादी-प्रतिवादी पक्षांचे जिथे लक्ष जाईल तिथे आज कारवाई केली जाईल.
सुरक्षेसाठी परिसराची दोन झोनमध्ये विभागणी - वाराणसीचे पोलीस आयुक्त ए सतीश गणेश यांनी सांगितले की, सुरक्षेसाठी संपूर्ण परिसराची दोन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. काशी आणि वरुणा झोनमध्ये अतिरिक्त सीपी स्तरावरील अधिकारी करण्यात आले आहेत. झोननंतर सेक्टर स्तरावर अधीक्षक स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणाचे काम शांततेत पार पाडल्याबद्दल काशीतील जनतेचे आभार व्यक्त करण्यासोबतच प्रसारमाध्यमेही संयमाने जबाबदारीने वार्तांकन करत असल्याचे ते म्हणाले.
वादी, प्रतिवादी आणि त्यांच्या वकिलांच्या व्यतिरिक्त, वकील आयुक्तांसह एकूण 52 लोकांना आत प्रवेश करण्याची परवानगी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. शेवटच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्तात कार्यवाही पूर्ण करून 17 मे रोजी व्हिडिओ पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत. शृंगार गौरी प्रकरणी खटला दाखल करणारे विश्व वैदिक हिंदू महासंघाचे प्रमुख डॉ. हरिशंकर जैन यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी दुसऱ्या दिवशीच्या कारवाईत अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या गोष्टी मिळाल्या आणि हिंदू बाजूची केस बळकट झाली आहे.
हेही वाचा - Ketki Chitale Case : वडिलांनी मरावं असे बोलणे कोणत्या संस्कृतीत बसते ? सुप्रिया सुळेंचा सुचक प्रश्न
हेही वाचा - ज्ञानवापी मशीद प्रकरण! काय आहे इतिहास; पहा ETV Bharat'चा खास रिपोर्ट