गुरुग्राम (हरियाणा): Shraddha Murder Case: दिल्लीतील प्रसिद्ध श्रद्धा हत्याकांडाचा तपास आता गुरुग्रामपर्यंत पोहोचला आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांचे एक पथक आज गुरुग्रामला पोहोचले. आरोपी आफताबच्या सांगण्यावरून पोलीस तपासासाठी डीएलएफ फेज 3 मधील जंगलात पोहोचले. येथून पोलिसांना एक काळी पिशवी सापडली Shradha Murder Evidence Gurugram Forests आहे. या पिशवीत आरोपी आफताब याने श्रद्धाचे तुकडे पुरले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. Shraddha murder accused Aftab PoonaWalla
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब हा गुरुग्राममध्येच एका कॉल सेंटरमध्ये काम करायचा. त्यामुळे तो गुरुग्रामहून ये-जा करत असे. आरोपी आफताबच्या सूचनेवरून दिल्ली पोलिसांनी आज गुरुग्रामच्या डीएलएफ फेज 3 मधील जंगलात शोध सुरू केला. यानंतर पोलिसांना एक काळी पिशवी सापडली, जी दिल्ली पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतली आहे.
तत्पूर्वी, आरोपी आफताबने पोलिसांसमोर कबुली दिली की, आपण आधी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि तिची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा जाळला. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, यासाठी इंटरनेटची मदत घेतल्याचेही त्याने कबूल केले.
विशेष म्हणजे आजपर्यंत पोलिसांना ना श्रद्धाचा मोबाईल सापडला, ना तिचे डोके, ना खुनात वापरलेले हत्यार. दिल्ली पोलीस वारंवार जंगलात हत्यांचे पुरावे शोधत आहे. मात्र, दिल्ली पोलिसांचे पथक बॅग घेऊन गुरुग्रामहून दिल्लीला रवाना झाले आहे. मात्र, पोलिसांनी जप्त केलेल्या बॅगेत श्रद्धाचे तुकडे आहेत की आरोपी आफताबने वापरलेले हत्यार सापडले आहे, हे तपासानंतरच समजेल.