हैद्राबाद : हैदराबादच्या हयातनगरमध्ये 10वी वर्गातील मुलीवर (17) सामूहिक बलात्काराच्या ( Gangrape ) प्रकरणाच्या तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अनेकदा त्यांच्या फोनवर अश्लील व्हिडिओ पाहिले आहेत. त्यांनीही असेच करण्याचा विचार केला. त्यासाठी 10वीच्या एका विद्यार्थ्याची निवड केली. ( Shocking Facts On Gangrape In Hyderabad )
अश्लील व्हिडिओ पाहून केला बलात्कार : दहावीत शिकणारा मुलगा त्याच्या पालकांचा स्मार्टफोन घेऊन अश्लील व्हिडिओ पाहत असे. त्याच शाळेत शिकणाऱ्या अन्य तीन विद्यार्थ्यांना त्यांनी ते दाखवले. शाळा सुटल्यानंतर ते रोज एका ठिकाणी जायचे आणि असे व्हिडिओ पाहायचे. हे महिनाभर चालले. या प्रमाने त्यांनी संबंधित व्हिडिओंप्रमाणेच करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दहावीच्या वर्गातील मुलीची निवड केली.त्यात पीडितेची मानसिकता वेगळी होती, ती तिच्या वयानुसार नव्हे तर लहान मुलासारखी वागत होती. यांचाच फायदा घेऊन त्यांनी तिला फसवले, पुस्तकाच्या नावाखाली घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यातील एकाने या सगळ्याचा व्हिडिओ काढला.
याला जबाबदार कोण : सामुहिक बलात्कारप्रकरणी पीडित मुलीची शाळा आणि निवासस्थान उघड झाल्याने राज्य मानवी हक्क आयोगाने संताप व्यक्त केल्याचे कळते. पोलिसांनी सांगितले की, काही मासिके आणि वाहिन्यांनी मुलीच्या निवासस्थानाचे आणि शाळेचे फोटो प्रकाशित केल्याचे आयोगाला आढळून आले आणि याला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
लैंगिक अत्याचार : हैद्राबादच्या हयातनगरमधून अशी क्रूर घटना समोर आली असून त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. येथे इयत्ता 9वी-10वीच्या 5 विद्यार्थ्यांनी 10वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला, व्हिडिओ बनवला आणि तो व्हॉट्सअॅपवर मित्रांसोबत शेअर केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीवर किमान दोनदा सामूहिक बलात्कार झाला आणि दोन्ही वेळा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर केल्यावर विद्यार्थिनीने तिच्या पालकांना लैंगिक अत्याचाराबाबत सांगितले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून तक्रार दाखल केली आहे.
संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला : पाचही मुले अल्पवयीन आहेत. या सर्वांनी ऑगस्ट 2022 मध्ये पहिल्यांदा विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एकाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. घटनेच्या 10 दिवसांनंतर दोन विद्यार्थी पुन्हा मुलीच्या घरी पोहोचले, मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि व्हिडिओ बनवला. विद्यार्थिनीने सांगितले की, मुलीने बलात्काराबाबत सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. असे असतानाही मुलांनी या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेअर केला. व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनीने तिच्या पालकांना बलात्काराची माहिती दिली. पालकांनी हयातनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.