ETV Bharat / bharat

Sanjay Raut on Azaan loudspeaker : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून अजानच्या लाऊड स्पीकरबाबत नोटीस- संजय राऊत यांची माहिती

नागपूरमधील जामा मशीदचे ( Jama Masjid Nagpur ) प्रमुख मोहम्मद हफीझुर रहमान ( Md Hafizur Rahman on loudspeaker ) यांनी अजानसाठी लावण्यात येणाऱ्या लाऊड स्पिकरबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, की अझानसाठी लावण्यात येणाऱ्या लाऊड स्पिकरचा आवाज हा मर्यादित असतो. त्याचा ध्वनी प्रदुषणाच्या ( noise pollution ) वर्गवारीत समावेश येत नाही.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Apr 7, 2022, 3:10 PM IST

Updated : Apr 7, 2022, 3:44 PM IST

नवी दिल्ली - प्रार्थनास्थळांवर लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरच्या विषयावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. अशातच शिवसेनेचे संजय राऊत यांनीही सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीही ( Maharashtra Home Minister ) अजानसाठी लावलेला लाऊड स्पीकरचा आवाड किती डेसीबल असावा, याबाबतची नोटीस बजाविल्याची माहिती शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on Azaan loudspeaker ) यांनी दिली आहे.

नागपूरमधील जामा मशीदचे ( Jama Masjid Nagpur ) प्रमुख मोहम्मद हफीझुर रहमान ( Md Hafizur Rahman on loudspeaker ) यांनी अजानसाठी लावण्यात येणाऱ्या लाऊड स्पिकरबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, की अजानसाठी लावण्यात येणाऱ्या लाऊड स्पिकरचा आवाज हा मर्यादित असतो. त्याचा ध्वनी प्रदुषणाच्या ( noise pollution ) वर्गवारीत समावेश येत नाही. दुसऱ्या कार्यक्रमांमुळे गोंधळ होत असतो. प्रार्थनास्थळ हे धार्मिक ठिकाण असते. अजान ही एक प्रकारची घोषणा असते.

  • #WATCH | Maharashtra Home Minister has also issued a notice stating how much Decibel level should be there while observing Azaan, says Shiv Sena leader Sanjay Raut on 'Azaan loudspeaker' issue pic.twitter.com/MRaKMDWwse

    — ANI (@ANI) April 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यात वाद-दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रार्थनास्थळावर लाऊड स्पिकर लावल्यास हनुमान चालीसा लावू, असे म्हटले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पाडवा मेळाव्याच्या भाषणात मशिदीवरचे भोंगे खाली उतरवा. अन्यथा आम्ही मशिदीसमोर लाउड्स्पिकरवर हनुमान चालीसा वाजवू, असे वक्तव्य केलं. राज ठाकरेंच्या या विधानांनतर राज्यात राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेले पहावयास मिळत आहे. मुंबईत काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावली देखील. पण पुण्यात मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे. अनेक मुस्लिम मनसैनिकांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. अगदी पक्षाच्या सुरुवातीपासून सोबत राहिलेल्या या पदाधिकाऱ्यांना आपला पक्ष सोडताना दुःख मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

अजान प्रसारित करणे हे इस्लामचा धार्मिक भाग नाही- लाऊडस्पीकरवरुन मोठ्या आवाजात अजान प्रसारित करणे हे इस्लामचा धार्मिक भाग नसल्याचे अलाबाद उच्च न्यायालयाने 2020 मध्ये स्पष्ट केले होते. अजान हा इस्लामचा भाग आहे, त्यामुळे मानवी आवाजात अजान सादर केली जाऊ शकते. मात्र, लाऊडस्पीकरबाबत हा नियम लागू होऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. शांत झोप घेणे हा माणसांचा मूलभूत अधिकार आहे. या अधिकारावर कोणीही केलेल्या ध्वनीप्रदूषणामुळे गदा येता कामा नये, असा आदेश न्यायमूर्ती शशिकांत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या एका खंडपीठाने दिला होता. अफजल अंसारी आणि शैयद मोहम्मद फैजल यांच्या याचिकांवार सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश होता.

  • Maharashtra| Azaan is a max of 2-2.5 min long, its volume stays within limit & doesn't come under category of noise pollution. Other programs create more noise. A mosque is a religious place & Azaan is a sort of announcement: Md Hafizur Rahman, Chairman, Jama Masjid Nagpur pic.twitter.com/E2bYe0I0Vm

हेही वाचा-अजानवरून राजकारण नको; नमाज म्हणजे 'अल्लाह की इबादत'

हेही वाचा-अजान सुरू होताच भाजप आमदारांनी भाषण थांबवून केला अजानचा सन्मान

हेही वाचा-ये राजनीती अच्छी नही, मशिदीवरील भोंग्यांवर मुस्लीम बांधवांच्या प्रतिक्रिया

Last Updated : Apr 7, 2022, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.