भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये महिलांविरोधात गुन्हे घडत असताना सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. महिलांसोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना रस्त्यात गोळ्या घालून ठार केले पाहिले, असे त्यांनी म्हटले. अशा गुन्हेगारांना कोणताही वकील की युक्तीवाद नको. त्यासाठी धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विनंती करणार असल्याचेही उषा ठाकूर यांनी सांगितले.
सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर म्हणाल्या, की महिला आणि मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणखी कठोर कायदे आहेत. मात्र, गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नाही. कडक कायदे असूनही महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबल्या नाहीत. अशा घटनांमागे समाज आणि आई-वडिलांचे संस्कार हेदेखील कारणे आहेत. त्यासाठी संपूर्ण समाजाने विचार करण्याची गरज आहे.
हेही वाचा-राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही १.६६ कोटी लशी उपलब्ध - केंद्र सरकार
मुख्यमंत्र्यांकडे ही करणार मागणी
मंत्री उषा ठाकूर म्हणाल्या, की नरपिशाचांना (गुन्हेगारांना) रस्त्यात उभा करून गोळी मारावी, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. अन्यथा या गुन्हेगारांना फाशी द्यायला हवी.
हेही वाचा-रणवीर-आलियाच्या 'प्रेमकहानी'त धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमीची एन्ट्री
महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांकरिता पाश्चिमात्य संस्कृती जबाबदार
महिलांवरील अत्याचार आणि अन्यायाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याबाबत बोलताना शालेय शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार म्हणाले, की अशा घटना वाढण्याला पाश्चिमात्य संस्कृती जबाबदार आहे. भारतामध्ये महिलांना देवीबरोबर स्थान दिले जाते. मात्र, पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाने विचार बदलले आहेत. लोकांचे नैतिक पतन झाले आहे. त्याविरोधात जनजागण करण्याची गरज आहे.
हेही वाचा-चांदी प्रति किलो ३९७ रुपयांनी महाग; जाणून घ्या सोन्याचे दर
महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवरून राजकारण
मध्य प्रदेशमध्ये महिला, आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद होत आहेत. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी अनेक प्रकरणांमध्ये भाजपचे लोक सामील असल्याचा आरोप केला आहे. नुकतेच एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये राजकारण सुरू झाले आहे. हत्येपूर्वी महिला आणि बालिकांवर अत्याचार व मारहाण केल्याचे समोर आले होते.