ETV Bharat / bharat

Shiv Sena Burnt Pakistan Flag : भारतीय जवानांवरील हल्ल्याचा शिवसेनेकडून निषेध, पाकिस्तानचा झेंडा जाळला - जम्मूमध्ये शिवसेना

जम्मू - काश्मीरच्या पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनेविरोधात देशभरात संताप उसळला आहे. विविध राजकीय पक्षांनीही या घटनेचा निषेध केला आहे. शिवसेनेने जम्मूमध्ये घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा आणि पीएएफएफ या दहशतवादी संघटनेच्या पुतळ्याचे दहन केले.

Shiv Sena Burnt Pakistan Flag
शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळला
author img

By

Published : Apr 21, 2023, 6:08 PM IST

पहा व्हिडिओ

जम्मू (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू - काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील भीमबेर गली भागात गुरुवारी लष्करी वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. या घटनेचा शिवसेनेच्या जम्मू - काश्मीर युनिटने जम्मूत तीव्र निषेध केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज आणि हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश - ए - मोहम्मदची पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी संघटना पीएएफएफच्या पुतळ्याला आग लावली.

पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याची मागणी : पक्षाचे राज्य प्रमुख मनीष साहनी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक जम्मूतील रूप नगर येथील पक्ष कार्यालयाजवळ जमले. त्यांनी जैश - ए - मोहम्मदची सहकारी संघटना पीएएफएफ आणि पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी पाकिस्तानवर जोरदार लष्करी हल्ला करण्याची मागणी देखील यावेळी केली.

'पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतो' : मनीष साहनी म्हणाले की, भारताने पाकिस्तानचा तीन वेळा सरळ युद्धात पराभव केला आहे. भारताविरुद्ध कट रचून आणि काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालून पाकिस्तान गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तेथे टंचाईसोबतच खाद्यपदार्थांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. कंगाल झालेला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरही डिफॉल्टर होण्याच्या मार्गावर उभा आहे. भारतासोबतचे संबंध सुधारावेत, अशी विनवणी ते करत आहेत. पण एवढे होऊनही पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया सोडत नाही.

'पाकिस्तानशी असलेले सर्व संबंध तोडा' : मनीष साहनी पुढे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानवर कठोर लष्करी कारवाई करून त्यांना धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. तसेच पाकिस्तानसोबतचे सर्व राजकीय, मुत्सद्दी, मैत्रीपूर्ण आणि व्यापारी संबंध पूर्णपणे बंद पाडण्याची वेळ आता आली आहे. साहनी म्हणाले की, 'पाकिस्तानने आमचे सैनिक मारले आहेत. त्यांचे प्रतिनिधी बिलावल भुत्तो यांना भारतीय भूमीवर पाय ठेवू देऊ नये'.

हे ही वाचा : Terrorist Attack on Army Vehicle : लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; ग्रेनेड फेकल्याने लागली आग, 5 जवान शहीद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.