ETV Bharat / bharat

‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसला रामराम ठोकत टीएमसीत प्रवेश करणार - टीएमसीट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. माहितीनुसार 21 जुलै रोजी कोलकाता येथे तृणमूलच्या शहीद दिनाच्या रॅलीत शत्रुघ्न सिन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करतील.

शत्रुघ्न सिन्हा
शत्रुघ्न सिन्हा
author img

By

Published : Jul 12, 2021, 8:44 AM IST

नवी दिल्ली - यशवंत सिन्हा यांच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. माहितीनुसार 21 जुलै रोजी कोलकाता येथे तृणमूलच्या शहीद दिनाच्या रॅलीत शत्रुघ्न सिन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करतील. शत्रुघ्न सिन्हा यांना तृणमूलच्या तिकिटावरून राज्यसभेत पाठवले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, याबाबत शत्रुघ्न सिन्हा यांना विचारले असता त्यांनी याची खातरजमा केली नाही.

शत्रुघ्न सिन्हा यांचे ममता बॅनर्जींशी चांगले संबंध आहेत. ममता यांनी तिसऱयांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनीही दीदींना शुभेच्छा दिल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना आव्हान देणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी आधीच केली आहे. त्यानुसार पश्चिम बंगालच्या बाहेरही पक्षाच्या विस्तारासाठी बिहारपासूनच सुरवात करण्यात येत असून यशवंत सिन्हा यांच्यानंतर बिहारी चेहरा म्हणून शत्रुघ्न सिन्हा यांची निवड ममता करणार असल्याची माहिती आहे.

राज्यसभेत तृणमूल काँग्रेसच्या दोन जागा खाली आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी टीएमसी सोडल्यानंतर राज्यसभेत एक जागा रिक्त झाली. तर ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नेते मानस भुनिया यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्याने दुसरी जागा खाली आहे. यातील एका जागेवर माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना पाठवण्याचा मानस ममतांचा आहे. यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. टीएमसीमध्ये प्रवेश करण्यासाठी सौरव गांगुलीचे मन वळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गांगुलीच्या वाढदिवसी ममता बॅनर्जी सौरवच्या घरी पोहचल्या होत्या. तर दुसऱ्या जागेवर शत्रुघ्न सिन्हा यांना पाठवणार असल्याची चर्चा आहे.

शत्रुघ्न सिन्हा गेली कित्येक वर्षे भाजपाविरोधात आवाज उठवत आहेत. भाजपाचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही कोलकाताच्या ब्रिगेड परेड मैदानावर तृणमूलच्या सभेत हजेरी लावली होती आणि ममता बॅनर्जी यांचे जाहीर कौतुक केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये शत्रुघ्न सिन्हा केंद्रीय मंत्री राहिले आहेत. भाजपमध्ये ३ दशक काम केल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये असताना पक्षाच्या कार्यप्रणालीवरून त्यांनी अनेकदा टीका केली होती. त्यामुळे त्यांना तेथे बंडखोर नेते म्हणून ओळखले जात होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.