ETV Bharat / bharat

Stock market: शेअर बाजार आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?, वाचा सविस्तर

शेअर बाजाराने मंगळवारी तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाई आणखी वाढण्याची भीती यामुळे गुंतवणूकदारांनी मंगळवारी इक्विटी मार्केटपासून दूर राहण्याचा विचार केला. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 120 डॉलरच्या वर जाताना दिसत आहेत.

Stock market
Stock market
author img

By

Published : Jun 1, 2022, 9:40 AM IST

मुंबई - शेअर बाजाराने मंगळवारी तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाई आणखी वाढण्याची भीती यामुळे गुंतवणूकदारांनी मंगळवारी इक्विटी मार्केटपासून दूर राहण्याचा विचार केला. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 120 डॉलरच्या वर जाताना दिसत आहेत.

युरोपियन युनियनने रशियाच्या तेल पुरवठ्यावर कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे बाजारातील भावना ढासळली आहे. अस्थिर व्यापाराच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 359.33 अंकांनी अर्थात 0.64 टक्क्यांनी घसरून 55,566.4 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 76.85 अंकांनी म्हणजेच 0.46 टक्क्यांनी घसरून 16,584.55 वर बंद झाला.

सेन्सेक्स निफ्टी वरच्या स्तरांवर नफा वसुलीमुळे (Profit Booking) घसरणीवर अर्थात लाल चिन्हावर बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीचे श्रीकांत चौहान म्हणाले. निकालांचा हंगाम संपल्यानंतर, व्यापारी बाजाराची दिशा ठरवण्यासाठी नवीन ट्रिगर शोधत आहेत. तांत्रिक दृष्टिकोनातून, डेली चार्टवर डबल टॉप फॉर्मेशन आणि डोजी कॅंडलस्टिक फॉर्मेशन सध्याच्या पातळींवरून बाजारात आणखी उतार-चढाव दाखवत आहेत. येत्या काळात निफ्टीसाठी 16,700 आणि BSE सेन्सेक्ससाठी 55,925 वर सपोर्ट आहे. जर निफ्टीने हा सपोर्ट तोडला तर तो 16,450 आणि 16,400 पर्यंत खाली जाऊ शकतो. सेन्सेक्सने त्याचा सपोर्ट तोडला तर तो 54,900-54,700 च्या दिशेने जाऊ शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 16,700 आणि सेन्सेक्स 55,925 च्या वर गेला तर आपल्याला त्यात अधिक तेजी दिसेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ओएनजीसी (ONGC)
  • एनटीपीसी (NTPC)
  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
  • कोल इंडिया (COALINDIA)
  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)
  • कोटक बँक (KOTABANK)
  • सन फार्मा (SUNPHARMA)
  • एचडीएफसी (HDFC)
  • रिलायन्स (RELIANCE)
  • श्री सिमेंट (SHREECEM)

हेही वाचा - Singer KK passes away: लोकप्रिय गायक केके काळाच्या पडद्याआड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.