ETV Bharat / bharat

रांचीत एनसीपीचा कार्यकर्ता मेळावा; राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती

रांचीमधील हरमू मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित आहेत.

रांचीत एनसीपीचा कार्यकर्ता मेळावा; राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती
रांचीत एनसीपीचा कार्यकर्ता मेळावा; राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती
author img

By

Published : Mar 7, 2021, 12:58 PM IST

रांची - झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. राजधानीतील हरमू मैदान येथे हा मेळावा घेण्यात येत आहे. संघटना बळकट करण्यासाठी झारखंडमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहिले असून ते कार्यकर्त्यांना संबोधीत करतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे हरमू येथे आयोजित मेळाव्यात सहभागी झाले. मेळाव्यासाठी हरमू मैदानात पक्षाचे आमदार कमलेश सिंग यांच्या देखरेखीखाली तयारी झाली. पहिल्यांदाच शरद पवार झारखंडमध्ये आले आहेत. झारखंडमध्ये प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांना पक्षाला मजबूत स्थितीत आणण्यासाठी मार्गदर्शन करतील, असे आमदार कमलेश सिंह यांनी सांगितले.

झारखंडमधील कार्यक्रमानंतर शरद पवार बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या राजकारणावरही चर्चा करू शकतात. शरद पवार हे देशातील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानंतर झारखंडमध्ये पक्षाचा अधिक चांगला विस्तार होईल आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण होईल, असेही कमलेश सिंह म्हणाले.

शरद पवारांना युपीए आघाडीचे अध्यक्ष केले पाहिजे. देशातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष त्याच्या सोबत आहेत. आज शेतकरी देशात आंदोलन करीत आहे. केंद्रात मंत्री असताना त्यांनी 80 हजार कोटी रुपयांचे शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले होते, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घेणार भेट -

एकदिवसीय रांची दौऱयात शरद पवार मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही भेट घेतील. दुपारी चार वाजता ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतील. हेमंत सोरेन सरकारला राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. कमलेशकुमार सिंग हे झारखंडमधील हुसेनाबाद येथील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.