ETV Bharat / bharat

शरद पवार अन् नितीश कुमार यांची भेट होणार; देशभरात रातकीय चर्चांना उधाण - शरद पवार आणि नितीश कुमार यांची भेट होणार

बिहारमध्ये नितिश कुमार यांनी नुकता मोठा राजकीय खेळ केला. एका दिवसात बाजू पलटत एनडीएतून युपीएत दाखल होत आपले महत्व आणि राजकीय वजन कायम ठेवले आहे. त्यानंतर राज्यासह देशभरात विरोधी पक्षांत नवा उत्साह पाहायला मिळत आहे. ( Sharad Pawar and Nitish Kumar will meet ) त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची आणि नितीश कुमार यांची भेट झाली. आता नितिश कुमार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 8 सप्टेंबरला भेट घेणार आहेत. ही भेट होणार असल्याची बातमी आल्यानंतर तत्काळ देशभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 3, 2022, 2:56 PM IST

Updated : Sep 3, 2022, 3:27 PM IST

नवी दिल्ली - बिहारमध्ये नितिश कुमार यांनी नुकता मोठा राजकीय खेळ केला. एका दिवसात बाजू पलटत एनडीएतून युपीएत दाखल होत आपले महत्व आणि राजकीय वजन कायम ठेवले आहे. त्यानंतर राज्यासह देशभरात विरोधी पक्षांत नवा उत्साह पाहायला मिळत आहे. ( Sharad Pawar and Nitish Kumar will meet ) त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची आणि नितीश कुमार यांची भेट झाली. आता नितिश कुमार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 8 सप्टेंबरला भेट घेणार आहेत. ही भेट होणार असल्याची बातमी आल्यानंतर तत्काळ देशभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नितीश कुमार आणि शरद पवार यांची भेट येत्या ( ८ सप्टेंबर )रोजी दिल्लीमध्ये होणार आहे. पवार यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांची रणनीती काय असावी, यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नीतीश कुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून ( NDA ) बाहेर पडले आहेत. त्यांनी भाजपसोबत काडीमोड घेत लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती करत बिहारमध्ये सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात लढण्यासाठी या बैठकीत काय रणनीती ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी ८ सप्टेंबर रोजी नीतीश कुमार यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शरद पवार यांची दिल्ली आणि मुंबईत येऊनही भेट घेतली होती. तसेच, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हेही पवारांना मुंबईत भेटले होते. त्यानंतर नीतीश कुमार हे पवारांना भेटत आहेत.

नीतीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता. भाजपसोबतची सत्ता सोडून नीतीशकुमार यांनी कट्टर विरोधक लालू यादव यांच्या पक्षाशी संधान साधले आहे. त्यानंतर नीतीशकुमार यांनी चंद्रशेखर राव यांचीही भेट घेतली आहे. त्यानंतर आता नीतीश हे पवारांना भेटणार आहेत, त्यातून त्यांनी विरोधी आघाडीत मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - Bombay High Court summons Bill Gates : बिल गेट्स हाजीर हो..; मुंबई उच्च न्यायालयाने धाडले समन्स

Last Updated : Sep 3, 2022, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.