ETV Bharat / bharat

Shaligram Rock Ayodhya : आज गोरखपूरमध्ये पोहचतील शालिग्राम खडक, अयोध्येत रामाची मूर्ती बनवण्यासाठी वापरले जाणार - yogi adityanath puja in Gorakhpur

अयोध्येतील राम मंदिरात रामाची मूर्ती बनवण्यासाठी वापरले जाणारे शालिग्राम खडक आज गोरखपूरला पोहचतील. हे खडक नेपाळच्या काली गंडकी नदीतून अयोध्येला आणले जात आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या शालिग्राम खडकांची विधीवत पूजा करतील.

Shaligram Rock Ayodhya
शालिग्राम खडक
author img

By

Published : Jan 31, 2023, 2:12 PM IST

Updated : Jan 31, 2023, 2:29 PM IST

गोरखपूर (उ. प्रदेश) : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी नेपाळच्या काली गंडकी नदीतून 60 दशलक्ष वर्ष जुने दोन शालिग्राम खडक आणले जाणार आहेत. या खडकांपासून भगवान श्रीरामाचे बालस्वरूप आणि माता सीतेची मूर्ती तयार केली जाणार आहे. सर्व धार्मिक प्रथांचे पालन करून ट्रकमधून हे खडक आणले जात आहेत. बिहारमार्गे खडक वाहतूक करणारी वाहने मंगळवारी दुपारी ४ वाजता गोरखपूरच्या हद्दीत प्रवेश करतील. ते सायंकाळी ७ नंतर गोरखनाथ मंदिरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांची रात्रीची विश्रांतीही गोरखनाथ मंदिरातच असेल. मुख्यमंत्री आणि गोरक्ष पीठाधीश्‍वर योगी आदित्यनाथ मंदिरात शालिग्राम खडकांचे स्वागत आणि पूजा करतील.

Shaligram Rock Ayodhya
शालिग्राम खडक

३० जानेवारीला अयोध्येकडे रवाना : गोरक्ष प्रांतातील विश्व हिंदू परिषदेचे प्रचार प्रमुख दुर्गेश त्रिपाठी यांनी सांगितले की, बुधवारी मुख्यमंत्री योगी हे शालिग्राम खडक पूर्ण आदराने अयोध्येला पाठवतील. कालीगंडकी नदी हे एकमेव ठिकाण आहे जेथे असे शालिग्राम खडक आढळतात. ही नदी दामोदर कुंडातून निघून गंगा नदीला मिळते. काली गंडकी नदीच्या पात्रातून काढण्यात आलेल्या या दगडांपैकी एक 26 टन आणि दुसरा 14 टनांचा आहे. प्रचार प्रमुख यांनी सांगितले की, हे खडक काढण्यापूर्वी काली गंडकी नदीची क्षमा मागण्यात आली. गालेश्वर महादेव मंदिरात 26 जानेवारीला शिलेचा रुद्राभिषेकही करण्यात आला. हे खडक दोन ट्रकवर ठेवून ३० जानेवारीला अयोध्येकडे रवाना झाले आहेत. मंगळवारी हे वाहन बिहारमधील गोपालगंजमार्गे उत्तर प्रदेशात दाखल होईल. तेथून पुन्हा कुशीनगर व जगदीशपूरमार्गे दुपारी चार वाजता गोरखपूरला पोहोचतील.

Shaligram Rock Ayodhya
शालिग्राम खडक

योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पूजा : शालिग्राम खडकांच्या गोरखपूरमधील आगमनाबाबत विहिंप आणि इतर कार्यकर्त्यांशिवाय सर्वसामान्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. गोरखपूरमध्ये प्रवेश करताना कुसमही जंगल तिराहे येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. गोरखनाथ मंदिरात पोहोचल्यानंतर हिंदू सेवाश्रमात संतांच्या हस्ते शालिग्राम खडकांचे स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेत सहभागी असलेल्या सर्व लोकांना मंदिरात भोजनाची आणि विश्रांतीची व्यवस्था केली आहे. 1 फेब्रुवारीला सकाळी यात्रेची विधीपूर्वक पूजा करून गोरक्ष पीठाधीश्‍वर योगी आदित्यनाथ या खडकांची अयोध्येला रवानगी करतील.

हेही वाचा : Story Of Operation Blue Star : ..म्हणून इंदिरा गांधींनी हल्ला करण्याचे आदेश दिले, ऑपरेशन ब्लू स्टारबाबत अनेक खळबळजनक खुलासे

Last Updated : Jan 31, 2023, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.