ETV Bharat / bharat

'बलात्कार हे Love DAY, Kiss Day आणि Hug Day चे परिणाम'; निर्भया प्रकरणातील दोषींचे वकिल ए. पी. सिंह यांचे विधान - ए. पी. सिंह

लव्ह डे (Love Day), किस डे (Kiss Day) आणि व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) ला प्रोत्साहन देत राहिल्यास समाजाने बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांसाठी तयार रहावे, असे विधान निर्भया प्रकरणातील दोषींचे वकिल ए. पी. सिंह यांनी केले आहे.

ap singh
ए. पी. सिंह
author img

By

Published : Aug 1, 2021, 7:47 AM IST

नवी दिल्ली - गोवा सामूहिक बलात्कार प्रकरणात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी ईटीव्ही भारत दिल्ली विभागाचे संपादक विशाल सूर्यंकांत यांनी निर्भया प्रकरणातील दोषींचे वकिल ए. पी. सिंह यांच्याशी खुली चर्चा केली. लव्ह डे (Love Day), किस डे (Kiss Day) आणि व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) ला प्रोत्साहन देत राहिल्यास, आशा परिणामांसाठी तयार राहावे लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

ईटीव्ही भारत दिल्ली विभागाचे संपादक विशाल सूर्यंकांत यांनी निर्भया प्रकरणातील दोषींचे वकिल ए. पी. सिंह यांच्याशी खुली चर्चा केली.

मुला-मुलींना रात्रभर Beach वर फिरून काय मिळते. रक्षाबंधन, भाऊबीजला प्रोत्साहन न देता, जर . Love Day, Kiss Day आणि Valentine Day ला प्रोत्साहन दिले. तर आशा परिणामांसाठी (बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटना) समाजाने तयार रहावे, असे ए. पी. सिंह यांनी म्हटलं.

ए. पी. सिंह हे मुळचे उत्तर प्रदेशचे असून ते अनेक वर्षांपासून वकिली करत आहेत. जेव्हा कोणी निर्भयाच्या आरोपींचा खटला लढण्यास तयार नव्हते. तेव्हा त्यांनी पुढे सरसावत केस आपल्या हातात घेतली. ए. पी. सिंह हे लखनऊ विद्यापीठातून कायदा पदवीधर असून डॉक्टरेटची पदवीदेखील त्यांनी मिळवली आहे. मुलींसंदर्भात त्यांनी यापूर्वी त्यांनी वादग्रस्त विधान केली आहेत. निर्भयाच्या आरोपींना फाशी होऊ नये, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. तसेच हाथरस प्रकरणही बलात्काराचे नसून ऑनर किलिंगचे असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच त्यांनी हाथरसमध्ये जाऊन आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावरूनही त्यांच्यावर जोरदार टिका झाली होती.

काय म्हंटले गोव्याचे मुख्यमंत्री?

25 जुलै रोजी गोव्याच्या बेनॉलिम बीचवर 14 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. या प्रकरणी सावंत यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या घटनेबद्दल मुलींच्या आई-वडिलांनाही दोष दिला होता. 'रात्री अपरात्री मुलींना बाहेर सोडताना आईवडिलांनी विचार करायला हवा. केवळ सरकार आणि पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. 14-15 वर्षांच्या मुली रात्रभर बीचवर थांबत असतील तर पालकांनी विचार करण्याची गरज आहे. अल्पवयीन मुलांना बाहेर सोडताना पालकांनीही जबाबदारी घ्यावी,' असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून सध्या प्रचंड गदारोळ सुरू आहे. सावंत यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

हेही वाचा - निर्भया प्रकरण : 'त्यांना पाकिस्तान अन् डोकलाम सीमेवर लढण्यास पाठवा'

हेही वाचा - भारतात फाशीवर बंदी आणावी - ए.पी. सिंह

हेही वाचा - Video: निर्भया बलात्कार प्रकरणाचा थोडक्यात घटनाक्रम...

हेही वाचा - 'निर्भया' प्रकरणाच्या आठ वर्षांनंतर अत्याचार मात्र कायम; एकट्या दिल्लीत यावर्षी बलात्काराचे पंधराशे गुन्हे..

हेही वाचा - निर्भया बलात्कार प्रकरण: संपूर्ण देशाला हादरवणारी घटना.. नेमकं काय घडलं होतं 'त्या' काळरात्री?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.