अमृतसर Seema Haider like love story: पाकिस्तानची मुलगी जवेरिया खानुम ही भारतीय तरुणाबरोबर विवाह करण्यासाठी भारतात आली. भारत सरकारनं 21 वर्षीय जावरिया खानुमला 45 दिवसांचा व्हिसा दिलाय. कराची येथील रहिवासी असलेल्या अजमत इस्माईल खान यांची मुलगी जावेरिया खानुमला व्हिसा मिळालाय. मंगळवारी जवेरियानं अटारी सीमेवरुन भारतात प्रवेश केला. भारतात प्रवेश करताच जवेरियाचे होणारे पती समीर खान आणि सासरे अहमद खान यांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केलं. जवेरिया आणि समीरचं लग्न येत्या 2024 च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोलकाता इथं होणार आहे.
पाकिस्तानची मुलगी जवेरिया खानुम : भारतात पोहोचल्यावर जवेरिया खानुम म्हणाली की, मला साडेपाच वर्षांनी व्हिसा मिळालाय. मी खूप आनंदी आहे. मी भारतात आहे, यावर विश्वास बसत नाही. भारत सरकारनं मला 45 दिवसांसाठी व्हिसा दिलाय. यासाठी मी अल्लाहकडे प्रार्थना केली होती. ही प्रार्थना मान्य झालीय. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही कोलकात्यात लग्न करणार आहोत. पाकिस्तानातही माझ्या घरातील सर्वजण आनंदी आहेत.
दोनदा नाकारण्यात आला व्हिसा : जवेरिया खानुमचा होणारा पती समीर म्हणाला की, जवेरियाला भेटल्यानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. मी या दिवसाची साडेपाच वर्षे वाट पाहिली. आता आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. समीर खान यानं भारत सरकारचं आभार मानलेत. जवेरियाचा होणारा पती समीर म्हणाला की, भारत सरकारनं यापूर्वी दोनदा व्हिसा देण्यास नकार दिला होता.
सामाजिक कार्यकर्त्यानं केली मदत: समीरनं सांगितलं की, दोनदा व्हिसा नाकारल्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मकबूल अहमद वासी कादियान यांनी त्यांना या प्रकरणात खूप मदत केली. त्यांच्या प्रयत्नांमुळं त्यांच्या होणाऱ्या वधूला भारत सरकारनं व्हिसा दिला. भारत सरकारनं जावेरिया खानुमला व्हिसा देऊन दोन्ही कुटुंबांना पुन्हा एकत्र करण्यात मदत केलीय. यासाठी मी भारत सरकारचे आभार मानतो. यामुळं भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी दृढ होतील.
हेही वाचा :