ETV Bharat / bharat

Secunderabad Railway Station riots: सिकंदराबाद रेल्वे स्थानक जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

केंद्र सरकारच्या अग्निपथ भरती योजनेच्या विरोधात 17 जून रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जाळपोळ ( Secunderabad Railway Station riots ) आणि हिंसाचाराची योजना केल्याच्या आरोपाखाली एका माजी सैनिकाला अटक करण्यात आली आहे. तेलंगणा रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली.

अवुला सुब्बा राव
अवुला सुब्बा राव
author img

By

Published : Jun 25, 2022, 6:43 PM IST

हैदराबाद : सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर 17 जून रोजी झालेल्या जाळपोळीचा कट रचल्याप्रकरणी एका माजी सैनिकाला अटक ( Ex-soldier arrested for Secunderabad riots )करण्यात आली आहे. तेलंगणा रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या अग्निपथ भरती योजनेच्या विरोधातील आंदोलनाचे हिंसेत रूपांतर झाले. 17 जून रोजी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी रेल्वे स्थानकावर केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, अवुला सुब्बा राव यांनी यापूर्वी सैन्यात नर्सिंग असिस्टंट ( Awula Subba Rao former Nursing Assistant ) म्हणून काम केले आहे आणि आता ते आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील नरसरावपेटा येथे साई संरक्षण अकादमी चालवतात. सुब्बा राव आणि त्यांच्या तीन साथीदारांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

निवेदनात म्हटले आहे की, आरोपीने आपल्या संस्थेत सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांकडून 3 लाख रुपयांचा बॉण्ड घेतला होता. केंद्राने अग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर आणि नंतर सैन्य भरतीसाठीची लेखी परीक्षा रद्द केल्यानंतर एका इच्छुक तरुणाला एआरओ (लष्कर भर्ती कार्यालय) येथे रॅली काढायची होती, असेही त्यात म्हटले आहे. निवेदनानुसार, सुब्बा राव आणि इतरांनी वेगवेगळे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आणि प्रत्येकाने सिकंदराबाद रेल्वे स्टेशन गाठावे आणि योजना मागे घेण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करावा असा संदेश पसरवला.

सुब्बा राव आणि इतर अकादमींना अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीमुळे व्यवसाय गमावण्याची भीती ( Agneepath schemes Subbaraos business in danger ) असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हिंसाचाराला पाठिंबा देणार्‍या संरक्षण अकादमीच्या इतर संचालकांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू असल्याचे त्यात म्हटले आहे.

हेही वाचा -Eknath Shinde Group Press : आमची एवढीच अपेक्षा आहे की, सेना भाजप एकत्र यावी - बंडखोर आमदार दिपक केसरकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.