नवी दिल्ली : केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ( Union Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia ) यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जर्मनीत दारुच्या नशेत असताना उतरविल्याच्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी मान्य केली. यासंदर्भात चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.
यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, घटनेची माहिती देणे लुफ्थांसा एअरलाइन्सवर अवलंबून आहे आणि त्याआधारे ते या प्रकरणात लक्ष घालतील. "ही आंतरराष्ट्रीय ठिकाण होते. आम्ही तथ्यांची पडताळणी करत आहोत, याची आम्हाला खात्री करावी लागेल. माहिती देणे हे लुफ्थांसावर अवलंबून आहे. मला पाठवलेल्या विनंतीच्या आधारे मी नक्कीच त्याकडे लक्ष देईन," असे सिंधिया यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या प्रकरणी केंद्र काय कारवाई करणार यावर माध्यमांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
शिरोमणी अकाली दलचे सुप्रीमो सुखबीर सिंग बादल ( Sukhbir Singh Badal ) यांनी सोमवारी आरोप केला होता की, सीएम मान यांना मद्यधुंद अवस्थेत लुफ्थांसाच्या फ्लाइटमधून उतरवण्यात आले. “सहप्रवाशांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थान्साच्या फ्लाइटमधून उतरवण्यात आले. कारण ते खूप मद्यधुंद होते, त्यांना चालताही येत नव्हते. आणि त्यामुळे उड्डाणाला 4 तासांचा विलंब झाला. 'आप'च्या राष्ट्रीय अधिवेशनाला ते पोहोचू शकले नाहीत. या बातमी जगभरातील पंजाबींची मान शरमेने खाली गेली आहे, असे ट्विट बादल यांनी ट्विट केले होते.