नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्ये अराजकाची स्थिती असताना अफगाणिस्तानच्या दुतावासाला सर्वोच्च न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अफगाणिस्तानच्या दुतावासाबाबतच्या प्रकरणाची याचिकेवर सहा आठवड्यांची स्थगिती दिली आहे.
अफगाणिस्तानचा दुतावास विरुद्ध दिल्लीच्या बांधकाम कंपनीचा सर्वोच्च न्यायालयात खटला आहे. या प्रकरणावर सुनावणी असताना अफगाणिस्तान दुतावासाची बाजू मांडणारे वकील अजाझ मकबुल यांनी अफगाणिस्तानकडून सूचना मिळणे शक्य नसल्याचे न्यायालयात सांगितले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाचे न्यायाधीश विनीत सरण आणि न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांनी सहा आठवड्यांचा वेळ पुरेसा आहे का, असे वकील मकबुल यांना विचारले. त्यावर वकील मकबुल यांनी या कालावधीत अफगाणिस्तान सरकारकडून कमीत कमी सूचना मिळू शकतील, असे सांगितले. आपण सर्वांनी शेजारी देशासाठी प्रार्थना करावी आणि लवकरच स्थिरता येईल, अशी आशा करू असेही मकबुल यांनी म्हटले. दिल्लीची बांधकाम कंपनी आणि अफगाणिस्तानच्या दुतावासात न्यायालयीन वाद सुरू आहे.
हेही वाचा-गोव्यात दोन परदेशी तरुणींचे आढळले मृतदेह, एकीने घेतला होता गळफास
अफगाणिस्तानमध्ये भयावह स्थिती-
अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेण्याची घोषणा केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्यासह अफगाणिस्तानमधील सुमारे 55 हजार लोक देश सोडून पळून गेले आहे. तालिबानकडून देशात करण्यात येणारे अत्याचार आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांचे देश सोडून जाण्याचे प्रयत्न यांचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा-काबूलमध्ये काय घडलं? अफगाणिस्तानातून भारतात सुखरूप परतलेल्या सविता शाही यांचा थरारक अनुभव
तालिबानी देश चालविण्यासाठी दिशाहीन-
अफगाणिस्तान सरकारचा पाडाव करून पूर्णपणे सत्ता मिळविलेला तालिबान दिशाहीनतेमुळे सैरभैर झाल्याची स्थिती सध्या बघायला मिळत आहे. देश चालविण्यासाठी कुठलेच धोरण किंवा योजना समोर नसल्याने माजी सरकारी अधिकाऱ्यांसमोर आर्जव करण्याची वेळ तालिबानवर ओढवल्याचे दिसत आहे. तालिबानच्या भीतीने अनेक सरकारी अधिकारी भूमिगत झाले आहेत. ते आता देशातून पलायनाच्या तयारीत असल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटले आहे.
हेही वाचा-अफगाणिस्तानचा नॅशनल फुटबॉलपटू अन्वरचा विमानातून कोसळून मृत्यू