पुरी : प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ( Padmashri Sudarshan Wishing PM Modi ) त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोदींची कलाकृती तयार केली आहे. त्यांनी ओडिशाच्या पुरी बीचवर १२१३ मातीचे चहा कप बसवून पाच फूट वाळूचे शिल्प तयार केले आहे. पटनायक यांनी 1213 मातीच्या चहाचे कप बसवून 'हॅपी बर्थडे मोदी जी' असा ( Sudarshan Patnaik Created Sculpture of PM Modi ) संदेश लिहिला आहे.
शिल्प बनवण्यासाठी लागली पाच टन वाळू : यासोबतच पंतप्रधान मोदींचा 5 फूट उंच वाळूचा पुतळा बनवण्यात आला आहे. या शिल्पासाठी त्यांनी सुमारे पाच टन वाळू वापरली. पटनायक यांनी पीएम मोदींच्या प्रत्येक वाढदिवसाला वाळूची वेगवेगळी शिल्पे बनवली आहेत. सुदर्शन म्हणाले, 'आम्ही हे मातीचे चहाचे ग्लास पीएम मोदींचा चहा विक्रेता ते देशाचे पंतप्रधान असा प्रवास दाखवण्यासाठी वापरले आहेत.
पद्मश्री सुदर्शनांचा जगातील 60 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय वाळू कला स्पर्धेत सहभाग : येथे मी माझ्या कलेच्या माध्यमातून पंतप्रधानांना शुभेच्छा देतो. पद्मश्री सुदर्शन यांनी जगभरातील 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय वाळू कला स्पर्धा आणि महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे. देशासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.