ETV Bharat / bharat

Salim Gang Murdered Girl : विवाहित भावासोबत अफेअर; सलिम गँगच्या गुंडांनी खून करुन घाघरा नदीत फेकला तरुणीचा मृतदेह, 'म्होरके' अटकेत - मोहम्मद अर्शद सिद्धीकी

Salim Gang Murdered Girl : विवाहित भावासोबत विद्यापीठातील तरुणीचं अफेअर असल्यानं घरात नेहमी तणाव राहून बदनामी होत होती. त्यामुळे इंटिग्रल विद्यापीठातील तरुणीचं अपहरण करुन तिचा खून केल्याची माहिती सलिम गँगच्या गुंडांनी पोलिसांना दिली.

Salim Gang Murdered Girl
सलमान उर्फ आफताब आणि मोहम्मद अर्शद सिद्धीकी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 11:10 AM IST

लखनऊ Salim Gang Murdered Girl: विद्यापीठातील तरुणीचं अपहरण करुन तिचा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सलिम गँगच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सलमान उर्फ आफताब आणि मोहम्मद अर्शद सिद्धीकी असं या सलिम गँगच्या अटक केलेल्या म्होरक्याची नावं आहेत. या मारेकऱ्यांनी इंटिग्रल विद्यापीठातील मुलीचा अपहरणानंतर खून ( Crime News ) करुन तिचा मृतदेह घाघरा नदीत फेकून दिला होता. विशेष म्हणजे हे मारेकरी एका व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना उत्तरप्रदेशच्या एसटीएफनं अटक केली आहे. इंटिग्रल विद्यापीठातील तरुणीचं विवाहित भावासोबत अपेअर असल्यामुळेच तिचा खून केल्याची कबुली मारेकऱ्यांनी पोलिसांना दिल्याचं पोलीस अधीक्षक विशाल विक्रम सिंह यांनी सांगितलं.

Salim Gang Murdered Girl
जप्त केलेला ऐवज

विद्यापीठातील तरुणीचं अपहरण करुन केला खून : सलिम गँगच्या सलिम रुस्तम सोहराब टोळीचे सक्रिय गुंड आहेत. या गुंडांनी इंटिग्रल विद्यापीठाजवळून एका मुलीचं अपहरण करुन तिचा खून केला होता. त्या मुलीचं अपहरण केल्यानंतर या गुंडांनी तिचा चाकूनं सपासप वार करुन खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह घाघरा नदीत फेकून दिला होता. त्यामुळे उत्तरप्रदेशात मोठी खळबळ उडाली होती.

सराफा व्यापाऱ्यावर टाकणार होते दरोडा : सलिम टोळीचे गुंड कुर्सी रोडवरील एका सराफा व्यावसायिकाला लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती उत्तरप्रदेश एसटीएफला मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून सलमान उर्फ ​​आफताब मलिक आणि मोहम्मद अर्शद सिद्दीकी या गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या गुंडांकडून एक कार आणि पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती उत्तरप्रदेशातील एसटीएफचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विशाल विक्रम सिंह यांनी दिली आहे.

विवाहित भावासोबत होतं मानसीचं अफेअर : इंटिग्रल विद्यापीठातील मविद्यार्थिनी तरुणीचं सलमान उर्फ ​​आफताब मलिक आणि मोहम्मद अर्शद सिद्दीकी या गुंडांनी अपहरण केलं होतं. अपहरणानंतर मानसीचा खून करुन तिचा मृतदेह घाघरा नदीत फेकल्याचं या गुंडांनी पोलिसांना सांगितलं. '4 सप्टेंबरला रात्री 10 वाजता इंटिग्रल विद्यापीठाजवळून तरुणीचं अपहरण केलं. तरुणीचं आणि सलमानच्या भावाचं अफेअर होतं. सलमानचा भाऊ विवाहित होता, मात्र तरीही त्यांना लग्न करायचं होतं. वारंवार नकार देऊनही ती तरुणी आणि माझा भाऊ लग्न करण्यावर ठाम होते, माझ्या भावाचं लग्न झालं असल्यानं माझ्या घरात तणाव होता. त्यामुळे आमची खूप बदनामी सुरु होती', अशी माहिती अर्शदनं पोलिसांना दिल्याचं पोलीस अधीक्षक विशाल विक्रम सिंह यांनी सांगितलं.

चाकू हल्ला करुन मृतदेह फेकला घाघरा नदीत : 'घरात असलेल्या तणावामुळे मी मानसीला मारण्याचा कट रचल्याचं अर्शदनं पोलिसांना सांगितलं. याबाबतची माहिती सलमानला पटवून दिली, असंही तो म्हणाला. 4 सप्टेंबरला आम्ही तरुणीला कारमधून नेलं. 4 ते 5 किलोमिटर अंतरावर कुर्सी रोडवर कारमध्ये दोघांनी तिच्यावर चाकूनं हल्ला केला. कारमध्ये बरचं रक्त सांडलं होतं. त्यानंतर आम्ही बहराईच रस्त्यावर घाघरा पुलावरुन तिला घाघरा नदीत फेकून दिलं', अशी माहिती अर्शदनं पोलिसांना दिल्याचं पोलीस अधीक्षक विशाल विक्रम सिंह यांनी सांगितलं. गुरुवारी ते सराफा व्यापाऱ्यांना लुटणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलं. हा व्यापारी रोज पैसे घेऊन पिकनिक स्पॉटवर येत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Delhi Murder Case : दिल्लीतील तरुणीच्या खून प्रकरणात आता लागणार पोक्सो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग पाठवणार नोटीस
  2. Kaushambi Honor Killing : निर्दयी बापासह भावांनी केली हत्या, प्रियकराशी बोलणं बेतलं जिवावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.