हैदराबाद - तेलंगणामध्ये 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह रेल्वेरुळांजवळ मिळाला असून, शरीरावर असलेल्या टॅटूमुळे त्याची ओळख पटली आहे.
राजूने 9 सप्टेंबरला हैदराबादमधील सैदाबादच्या सिंगरेनी कॉलनीत राहणाऱ्या 6 वर्ष मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. एक आठवड्यापासून पोलीस आरोपीचा तपास करत होते. पोलीसांनी आरोपीला पकडणाऱ्या माणसाला 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. राजू बुधवारी उप्पल परिसरात दिसल्याचे पोलिसांनी सांगितले. संपूर्ण शहरात पोस्टर लावल्याने त्याची वाचण्याची कोणतीच शक्यता नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.
आरोपीला होईल योग्य ती शिक्षा
याआधी तेलंगणाचे श्रम मंत्री मल्ला रेड्डी यांनी मंगळवारी हैदराबादमध्ये सहा वर्ष मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिवानिशी मारले जाईल असे सांगितले होते. श्रम मंत्री मल्ला रेड्डी यांच्याआधी राज्य काँग्रेस प्रमुख रेवंत रेड्डींनीही नंतर श्रम असेच विधान केले होते. हैदराबादमधील एका कार्यक्रमात नेत्यांनी आरोपीला अटक करून शिक्षा देणार असल्याचेही सांगितले.
यादाद्री भुवनागिरी मधून केले आरोपीला अटक
विरोधी पक्षनेत्यांनी मुलीच्या परिवाराची भेट घेतली नव्हती. यावर मंत्र्यांनी सांगितले की, ते पिडीतेच्या कुटुंबाशी भेटू शकतात. आरोपीला शिक्षा देण्याबाबत अनेक नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. याआधी आरोपीला यादाद्री भुवनागिरी जिल्ह्यातील पैतृक गावातून अटक करण्यात केल्याचेही पोलिसांच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
त्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी फरार आहे. कमिश्नर टास्क फोर्सचे पंधरा विशेष पोलीसांचे पथक आरोपीच्या मागावर होते. त्यांच्या हाती एक सीसीटीव्ही फूटेज लागले असून,यात आरोपी टोपी आणि चेहरा झाकून दिसून आला होता. सैदाबादमधील 27 वर्षीय आरोपीने 9 सप्टेंबरला मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली.
गेल्या गुरूवारी सायंकाळी पाच वाजता मुलीचा मृतदेह सापडला. उस्मानिया रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आणि गळा घोटून हत्या केल्याचे समोर आले. यावर शुक्रवारी समाजाच्या सर्व स्तरातून नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी चंपापेट-सागर रोडवर आंदोलन करत आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली.
हेही वाचा - Time Influential List: टाईमच्या जगातील 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत मोदी, ममता बॅनर्जी अन् आदर पूनावाला