ETV Bharat / bharat

पालघरमधील 'त्या' घटनेची पश्चिम बंगालमध्ये पुनरावृत्ती? अपहरणकर्ते असल्याच्या संशयातून साधूंना मारहाण - तृणमूल काँग्रेस

Sadhus Assaulted in West Bengal : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात जमावानं साधूंच्या एका गटाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यानंतर भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर हल्ला चढवलाय. मात्र टीएमसीनं या आरोपांवर लगेच प्रतिक्रिया दिली नाही.

Sadhus Assaulted in West Bengal
Sadhus Assaulted in West Bengal
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 1:16 PM IST

कोलकाता Sadhus Assaulted in West Bengal : पश्चिम बंगालमधील गंगासागर इथं जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील तीन साधूंना गुरुवारी सायंकाळी जमावानं मारहाण केलीय. या घटनेनंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी 12 जणांना अटक केलीय. अटक केलेल्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्याचंही सांगितलं जातंय. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. लोकांनी साधूंना घेरलं आणि ते अपहरणकर्ते असल्याचा संशय घेऊन त्यांना मारहाण केलीय.

अपहरणकर्ते असल्याच्या संशयातून मारहाण : मिळालेल्या माहितीनुसार, हे साधू भाड्याच्या गाडीतून गंगासागरला जात होते. त्यांच्यासोबत कारमध्ये एक माणूस त्याच्या दोन मुलांसह होता. रस्ता विचारण्यासाठी तो पुरुलिया जिल्ह्यातील एका ठिकाणी थांबले. यातच साधूंनी तीन मुलींना काहीतरी सांगितलं, त्यानंतर त्या मुली ओरडू लागल्या आणि पळू लागल्या. यामुळं ते साधू नसून अपहरण करणारे असल्याचा संशय स्थानिकांना होता. त्यानंतर जमाव जमला आणि त्यांनी साधूंना मारहाण करण्यास सुरुवात केली.

पोलीस काय म्हणाले : घटनास्थळी बनवलेल्या व्हिडिओमध्ये जमाव पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करताना दिसत आहे. प्रकरण वाढल्यानं स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत साधूंची सुटका करुन काशीपूर पोलीस ठाण्यात नेलं. याप्रकरणी पुरुलियाचे पोलीस अधीक्षक अभिजित बॅनर्जी म्हणाले की, "याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चालू आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे. साधूंना गंगासागर इथं जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलीय.

भाजपाकडून ममतांवर टिकास्त्र : दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपानं या घटनेवरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टिका करत या घटनेचा निषेध केलाय. पक्षानं X वर (पुर्वीचं ट्विटर) पोस्ट केली की, ममता बॅनर्जींना त्यांच्या मौनाची लाज वाटली पाहिजे! हे हिंदू संत तुमच्या मान्यतेच्या लायक नाहीत का? या अत्याचाराची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी करतो.

हेही वाचा :

  1. Maharaj Molesting Woman Gondia : महिलेशी छेडखानी करणाऱ्या महाराजाला नागरिकांनी बेदम चोपले
  2. शिर्डी काँग्रेस शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला, रॉडनं बेदम मारहाण
  3. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण : भाजपा आमदार कॅप्टन तमिळ सेलवनची शिक्षा उच्च न्यायालयानं तात्पुरती केली स्थगित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.