किव्ह - युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धावर अमेरिकेची नजर कायम आहे. (NATO)च्या बैठकीत (NATO Summit On Russia Ukraine War) अमेरिकेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, की रशियाला जी-20 मधून बाहेर काढायचे आहे. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यासंदर्भात नाटोच्या तातडीच्या बैठकीनंतर ब्रुसेल्समध्ये बायडेन यांनी हे वक्तव्य केले.
युक्रेनला मानवतावादी मदत देण्याचे वचन - (G20)हा 19 देशांचा आणि युरोपियन युनियनचा एक आंतरशासकीय मंच आहे, जो प्रमुख जागतिक समस्यांवर काम करतो. बायडेन म्हणाले की आपण हा मुद्दा इतर जागतिक नेत्यांकडे मांडला आहे. इंडोनेशिया आणि इतरांनी असहमत असल्यास रशियाला गटातून बाहेर काढले पाहिजे असही ते म्हणाले आहेत. बायडेन आणि पाश्चात्य सहयोगींनी गुरुवारी (दि. 24 मार्च)रोजी रशियावर नवीन निर्बंध लादण्याचे आणि युक्रेनला मानवतावादी मदत देण्याचे वचन दिले आहे.
रुग्णालयांचे संरक्षण करण्याचे आवाहन - युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या आपत्कालीन बैठकीला संबोधित केले. यावेळी लष्करी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, बेलारूसच्या एका प्रमुख नेत्याने इशारा दिला आहे की, युक्रेनमध्ये शांतता सैन्य तैनात करण्याच्या पोलंडच्या प्रस्तावामुळे तिसरे महायुद्ध होऊ शकते. येथे, युक्रेनमधील मानवतावादी संकटासाठी रशियाला जबाबदार धरणारा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेने एकमताने मंजूर केला आहे. या ठरावात ताबडतोब युद्धबंदी लागू करून लाखो नागरिकांसह घरे, शाळा आणि रुग्णालयांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेलारूस हा रशियाचा मित्र आहे - बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी सांगितले, की याचा अर्थ तिसरे महायुद्ध होईल, पोलंडने गेल्या आठवड्यात शांतता मोहिमेच्या ऑफरचा संदर्भ दिला. बेलारूस हा रशियाचा मित्र आहे आणि त्याने रशियाला युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी आपल्या भूभागाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. ते म्हणाले, परिस्थिती अत्यंत गंभीर आणि तणावपूर्ण आहे. त्याचवेळी, उत्तरेकडील चेर्निहाइव्ह शहरातील स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, की रशियन सैन्याने जाणूनबुजून अन्न दुकानांना लक्ष्य केल्यामुळे लोकसंख्येसाठी आपत्ती निर्माण झाली आहे.
शहरात फक्त मानवतावादी मदत - या आठवड्यात झालेल्या हवाई हल्ल्याने डेस्ना नदीवरील पूल नष्ट केला, जो युक्रेन-नियंत्रित प्रदेशातून दक्षिणेकडे अन्न आणि इतर मदत आणण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. शहरात फक्त मानवतावादी मदत, औषधे आणि अन्न यायचे. मात्र, शहर पूर्णपणे युक्रेनियन सैन्याच्या ताब्यात असल्याचा दावा त्यांनी केला. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधून पळून गेलेल्या साडेतीन लाख लोकांपैकी एक लाख निर्वासितांना अमेरिका येथे आश्रय देईल. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
संरक्षण करण्यासाठी उपकरणे पाठवण्याचे मान्य - सेक्रेटरी-जनरल जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणतात की लष्करी युती रासायनिक आणि अण्वस्त्रांविरूद्ध संरक्षण वाढवत आहे, कारण रशिया युक्रेनमध्ये अशी शस्त्रे वापरू शकतो अशी चिंता वाढत आहे. स्टोलटेनबर्ग म्हणतात की नाटोच्या नेत्यांनी गुरुवारी त्यांच्या शिखर परिषदेत युक्रेनला रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपकरणे पाठवण्याचे मान्य केले आहे.
हेही वाचा - योगी आदित्यनाथ घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ! कार्यक्रमाला 'हे' मान्यवर लावणार हजेरी