ETV Bharat / bharat

Pancharatna Yatra: शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीला प्रोत्साहनपर 2 लाख रुपये देणार -कुमारस्वामी - girls who marry farmers sons

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले की, त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आमच्या पंचरत्न यात्रेच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे असही ते म्हणाले आहेत. ते हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे येथे आयोजित पंचरत्न यात्रा संमेलनात बोलत होते.

File Photo
File Photo
author img

By

Published : Mar 11, 2023, 3:31 PM IST

हसन (कर्नाटक) : विधानसभा निवडणूक (२०२३)च्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मोठी घोषणा केली आहे. जेडीएस हा शेतकऱ्यांचा पक्ष असल्याचे एचडी कुमारस्वामी यावेळी म्हणाले आहेत. प्रादेशिक पक्षाशिवाय राज्याचा विकास होऊ शकत नाही असही ते म्हणाले आहेत. यावेळी आमचा पक्ष सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना दोन लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल अशी अगळी-वेगळी घोषणा कुमारस्वामी यांनी केली आहे. हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे येथे आयोजित पंचरत्न यात्रा संमेलनात कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली.

2 लाख प्रोत्साहनपर रक्कम : शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. मी पाहिलं की शेतकऱ्यांच्या अविवाहित तरुणांनी चामराजनगर जिल्ह्यातील माले महाडेश्वर टेकडीवर लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभमीवर शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आमच्या पंचरत्न यात्रेच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे असही ते म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख प्रोत्साहनपर रक्कम देण्याची महत्त्वाची योजना आम्ही राबवणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.

मी गरीबांच्या समस्या पाहिल्या आहेत : 'आम्ही सत्तेत असलो किंवा नसो, आम्ही कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर दबाव आणला नाही. आरोप करणाऱ्यांनी हे आरोप आधी का केले नाहीत? आमच्या पक्षाकडे निधीची कमतरता आहे हे खरे आहे. चांगले लोक पक्षाच्या भल्यासाठी पैसे देतात. तुम्ही ते पैसे स्वत:कडे ठेवू शकत नाहीत. तसेच, ते आनंदात आणि घरीही खर्च करू शकत नाहीत. दरम्यान, मी गरीबांच्या समस्या पाहिल्या आहेत. त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी मी पंचरत्न रथयात्रा करत आहे असही कुमारस्वामी म्हणाले आहेत.

तुम्ही जेडीएसला मत द्याल तर भाजपला मत : यावेळी कुमारस्वामी यांनी भाजपवर टीका केली आहे. राज्यात पुन्हा डबल इंजिनचे सरकार का आले, असा सवाल जनतेला केला. सिंचन योजनेचे काय झाले माहित आहे? कुमारस्वामी यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी ते म्हणाले की, सिद्धरामय्या म्हणतात की, तुम्ही जेडीएसला मत द्याल तर भाजपला मत द्याल. त्यांनी सिद्धरामय्या यांच्या पक्षाचे वर्णन भाजपची बी टीम असेही केले आहे.

लाखो कार्यकर्ते ही या पक्षाची ताकद : आमच्या पंचरत्न यात्रेमुळे भाजप आणि काँग्रेसची चिंता आणि अस्वस्थता वाढली आहे. भाजप आणि काँग्रेस आमचा जेडीएसचा बालेकिल्ला तोडू शकणार नाहीत. त्याचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देवेगौडा यांनी उभे केलेले लाखो कार्यकर्ते ही या पक्षाची ताकद आहे, जोपर्यंत ते आहेत, तोपर्यंत आमच्या पक्षाला कोणीही काही करू शकणार नाही असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : ईडीच्या छापेमारीवर लालु यादव यांचे ट्विट, आरजेडी नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.