ETV Bharat / bharat

Royal Bengal Tiger Dies : देशातील सर्वात वयोवृद्ध वाघ 'राजा'चा मृत्यू.. 'असा' दिला अखेरचा निरोप

देशातील सर्वात वृद्ध ( Oldest Tiger In India ) वाघाचा सोमवारी मृत्यू ( Royal Bengal Tiger dies ) झाला. 'राजा' नावाच्या या वाघाला मगरीने चावा घेतला ( Crocodile Attack On Tiger ) होता. तेव्हापासून तो दक्षिण खैरबारी येथील रॉयल बंगाल टायगर रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये उपचार घेत होता.

Royal Bengal Tiger Dies
देशातील सर्वात वयोवृद्ध वाघ 'राजा'चा मृत्यू
author img

By

Published : Jul 12, 2022, 8:38 AM IST

जलपाईगुडी ( पश्चिम बंगाल ) : भारतातील सर्वात जुन्या वाघांपैकी ( Oldest Tiger In India ) एक असलेल्या राजा या वाघाचा सोमवारी पहाटे उत्तर बंगालमधील बचाव केंद्रात वयाच्या २५ वर्षे आणि १० महिन्यांचा असताना मृत्यू ( Royal Bengal Tiger dies ) झाला. सुंदरबनमध्ये मगरीने चावल्याने जखमी झालेल्या रॉयल बंगाल टायगर राजाचा दुर्दैवी मृत्यू ( Crocodile Attack On Tiger ) झाला. राजाला सुंदरबनमधून जलदापारा वनविभागाच्या दक्षिण खैरबारी येथील रॉयल बंगाल टायगर रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. जिथे त्याने सोमवारी अखेरचा श्वास घेतला.

वाघाच्या मृत्यूने वन कर्मचाऱ्यांमध्ये शोकाचे वातावरण : राजा सुंदरबनमधील मातला नदी ओलांडत असताना त्याच्या डाव्या पायाला मगरीने चावा घेतला. तेव्हापासून वनविभागाने राजाला खैरबारीत आणले. वयाच्या 11 व्या वर्षी राजाला सुंदरबनमधून दक्षिण खैरबारी येथे आणण्यात आले होते. राजा वन कर्मचारी पार्थसारथी सिन्हा यांच्या देखरेखीखाली बरा होत होता. पण वृद्धत्वामुळे तो पूर्णपणे बरे होऊ शकला नाही. वाघाच्या मृत्यूमुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

देशातील सर्वात वयोवृद्ध वाघ 'राजा'चा मृत्यू

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिला निरोप : अलीपूरद्वार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरेंद्र कुमार मीना आणि जलदापारा वन विभागाचे जिल्हा वन अधिकारी दीपक एम राजा हे राजाला अंतिम निरोप देण्यासाठी दक्षिण खैरबारी येथे पोहोचले होते. एसके मीना म्हणाले, 'रॉयल ​​बंगाल टायगर राजाला 2008 मध्ये मगरीच्या हल्ल्यानंतर सुंदरबनमधून वाचवत आणण्यात आले होते. तो वृद्ध होता आणि काही काळापासून आजारी होता. त्याचा मृत्यू दुर्दैवी आहे, लोक विशेषत: त्याला भेटायला यायचे.

बिबट्याचा मृतदेह सापडला : दरम्यान, दार्जिलिंगमध्ये एका काळ्या बिबट्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच दार्जिलिंग वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि काळ्या वाघाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला.

हेही वाचा : Tiger Attack On Couple in Chandrapur : जंगलात गेलेल्या पती-पत्नीवर वाघाचा हल्ला; पत्नीचा मृतदेह आढळला, पती अद्याप बेपत्ता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.