ETV Bharat / bharat

Abdul Kareem Tunda Case : बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची रोहतक कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली - संशयित दहशतवादी अब्दुल करीम टुंडा

रोहतक येथील बॉम्बस्फोट प्रकरणात जिल्हा न्यायालयाने संशयित दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता केली आहे. या स्फोटात टुंडाचा काही हात होता हे पोलीस न्यायालयात सिद्ध करू शकले नाहीत.

Abdul Kareem Tunda Case
अब्दुल करीम टुंडाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
author img

By

Published : Feb 17, 2023, 7:21 PM IST

रोहतक येथील बॉम्बस्फोट प्रकरणात रोहतक न्यायालयाने अब्दुल करीम टुंडा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. 1997 मध्ये रोहतकमध्ये दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजकुमार यादव यांच्या न्यायालयाने संशयित दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान रोहतक पोलिसांना या स्फोटांमध्ये टुंडाची कोणतीही भूमिका असल्याचे सिद्ध करता आले नाही. अब्दुल करीम टुंडा सध्या राजस्थानमधील अजमेर तुरुंगात आहे.

कसा आणि कुठे झाला होता स्फोट : यापूर्वी 13 फेब्रुवारी रोजी रोहतक कोर्टाने या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता. यापूर्वी १५ फेब्रुवारीला निकाल येणार होता, मात्र त्या दिवशी न्यायाधीश रजेवर होते. त्यामुळे न्यायालयाने आज निकाल दिला आहे. विशेष म्हणजे 1997 मध्ये रोहतक शहरात दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्बस्फोट जुनी सब्जी मंडी येथे झाला आणि दुसरा किला रोडवर सुमारे तासाभराने झाला. मात्र, या बॉम्बस्फोटांमध्ये कोणीही मारले गेले नाही. अनेक जण जखमी झाले होते.

तीन वर्षांनंतर लागला होता शोध : रोहतक स्फोट प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन वर्षांनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली. चौकशीदरम्यान, यूपीचा रहिवासी असलेल्या अब्दुल करीम टुंडा याचा बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले, मात्र तोपर्यंत अब्दुल करीम पाकिस्तानातील कराची शहरात गेला होता. दीड दशकानंतर अब्दुल करीम टुंडा नेपाळमार्गे भारतात आल्यावर त्याला दिल्ली पोलिसांनी सीमेवर अटक केली.

रोहतक पोलिसांनी आरोपीला दिल्लीहून प्रोडक्शन वॉरंटवर आणले. तेव्हापासून त्याच्यावर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोटाचा खटला सुरू होता. सुरक्षेच्या दृष्टीने त्याला गाझियाबादच्या डासना तुरुंगात ठेवण्यात आले होते, मात्र टुंडावर अजमेरमध्ये टाडा कायद्यांतर्गत खटला सुरू होता. त्यामुळे त्याला अजमेर कारागृहात हलवण्यात आले होते.

न्यायालयात टुंडावरील आरोप सिध्द होऊ शकले नाही : या बॉम्बस्फोटांमध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील पिलखुआ गावातील अब्दुल करीम उर्फ ​​टुंडा याचा हात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यावेळी ते परदेशात गेले होते. 2013 मध्ये अब्दुल करीम टुंडा नेपाळमधून भारतात आल्यावर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर रोहतक येथील बॉम्बस्फोट प्रकरणात प्रोडक्शन वॉरंटवर त्याला रोहतक कोर्टात हजर करण्यात आले होते. टुंडाचे वकील विनीत वर्मा यांनी सांगितले की, खटल्याच्या सुनावणीदरम्यान पोलिसांना असे कोणतेही पुरावे आणि साक्षीदार सादर करता आले नाहीत. जेणेकरून या दोन्ही स्फोटांमध्ये टुंडाची काही भूमिका होती हे सिद्ध होऊ शकेल.

हेही वाचा : Army Jawan Murder Case: लष्करी जवानाचा खून आपसातील वादातून, राजकारणाचा संबंध नाही - पोलीस अधिक्षक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.