पाकुड (झारखंड) - झारखंडच्या पाकुडमध्ये बुधवारी सकाळी साहिबगंज गोविंदपूर महामार्गावर एका भीषण अपघातात 10 लोकांचा मृत्यू झाला ( Jharkhand Bus Accident ) आहे. पाकुडहून दुमका येथे जात असलेली बस लिट्टीपाडा-अमडापाडा रोडवर पडेरकोलाजवळ गँस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला धडकली. बसमध्ये 40 पेक्षा जास्त लोक होते अशी माहिती मिळाली आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता -
या अपघातात जवळपास 25 लोक जखमी आहेत. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. बसमध्ये बसलेले लोक त्यात अडकले. बसची बॉडी कापून लोकांना बाहेर काढले जात आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
घटनास्थळावर बचाव कार्य सुरू -
मिळालेल्या माहितीनुसार, बरहरवा येथून दुमाका येथे जात असलेल्या बस आणि एलपीजी सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. ही घटना कमरडीहा गावाजवळ झाली. धुक्यामुळे ट्रक आणि बसमध्ये धडक झाली असावी असे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच, अमडापाडा ठाणेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख -
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अपघाताच्या बातमीने मी खूप दुःखी आहे. भगवान दिवंगतांच्या आत्माला शांती देवो आणि त्यांच्या नातेवाईकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. त्यांनी जिल्हा प्रशासनाला योग्य तत्काळ उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - Kissing Stunts on Motorcycle : 'तडप' चित्रपटाचा ट्रेलर बघून मित्रांचं चॅलेंज स्वीकारत केला स्टंट