ETV Bharat / bharat

Bikaner Car Accident : राजस्थानमध्ये दोन कार समोरासमोर धडकल्या.. भीषण अपघातात चौघांचा मृत्यू - बिकानेरमध्ये दोन कार समोरासमोर धडकल्या

रविवारी बिकानेर ते श्रीडुंगरगड दरम्यान झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने ही घटना घडली. ( head on collision of two cars ) ( Road Accident in Bikaner )

Bikaner Car Accident
Bikaner Car Accident
author img

By

Published : Aug 7, 2022, 6:35 PM IST

बिकानेर ( राजस्थान ) : जिल्ह्यातील श्रीडुंगरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी एक रस्ता अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच श्रीडुंगरगड पोलीस स्टेशनने घटनास्थळ गाठून चारही मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन पीबीएम रुग्णालयाच्या शवागारात ठेवले. त्याचवेळी या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पीबीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( head on collision of two cars ) ( Road Accident in Bikaner )

डुंगरगडचे पोलीस अधिकारी वेदपाल शेओरान यांनी सांगितले की, रविवारी बिगा गावाजवळ इनोव्हा कार आणि बोलेरोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात इनोव्हा कारचालक आणि कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या कारमधील जयपूर येथील रहिवासी संजय आणि कारचालकाचाही मृत्यू झाला. या घटनेत मृत संजयची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

वेदपाल शेओरान यांनी सांगितले की, जखमी महिलेला गंभीर अवस्थेत पीबीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसएचओ वेदपाल यांनी सांगितले की, दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्याचवेळी या घटनेनंतर महामार्गावर काही काळ चक्का जाम झाला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला केली. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा : Terrible Accident : भरधाव स्कार्पिओने दोन मोटरसायकलींना उडवले, भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.