ETV Bharat / bharat

Road Accident In Ambala : ट्रकने बसला मागून दिलेल्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी

author img

By

Published : Mar 3, 2023, 8:17 PM IST

पंचकुला यमुनानगर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी एका ट्रकने बसला मागून धडक दिली. त्यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 20 हून अधिक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.

Road Accident In Ambala
अंबाला येथे झालेला रस्ता अपघात
अंबाला येथे झालेला रस्ता अपघात

अंबाला : अंबाला येथे शुक्रवारी झालेल्या रस्ता अपघातात, पंचकुला यमुनानगर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने बसला मागून धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की, आठ लोकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वीसहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ६ जणांचे मृतदेह अंबाला येथील नारायणगढ सिव्हिल हॉस्पिटलच्या शवविच्छेदनगृहात ठेवले आहे आणि मृतदेह पंचकुला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम करिता पाठवले आहे.

Road Accident In Ambala
अंबाला येथे झालेला रस्ता अपघात

अपघाताचे कारण गुलदस्त्यात : ही धडक इतकी भीषण होती की, बसच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले. धडकेनंतर ट्रकही पलटी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये बहुतांश मजूर होते जे यूपी बरेलीहून हिमाचल प्रदेशातील बड्डीला जात होते. बस शहजादपूरजवळ येताच मागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. ट्रक लोखंडी पत्र्याने झाकलेला होता. या अपघाताचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा तपास सुरू आहे.

Road Accident In Ambala
अंबाला येथे झालेला रस्ता अपघात

घटनेची कसून चौकशी करणार पोलिस : अंबाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना उपचार घेण्यास नजीकच्या रुगण्लायात दाखल करण्यात आले आहे. अंबाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे. घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेले सीसीटीव्ही तपासले जात आहेत; जेणेकरून काही पुरावे सापडतील. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या अपघातास जबाबदार व्यक्तीवर कारवाई केली जाईल.

हरियाणात ३ मार्चचा दिवस अपघातांचा शुक्रवार म्हणून आला. शुक्रवारी राज्यात तीन भीषण रस्ते अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या अपघातांचे चित्र हसू देणारे आहेत. अंबाला येथे 8 जणांचा मृत्यू- पंचकुला यमुनानगर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी ट्रॉलीने एका खासगी बसला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसमधील 8 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले. ट्रॉलीने उभ्या बसला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॉली आणि बसचा चक्काचूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस उत्तर प्रदेशातील बरेलीहून हिमाचलमधील बड्डीला जात होती.

फरीदाबादमध्ये 6 मित्रांचा मृत्यू गुरुवारी रात्री उशिरा गुरुग्राम-फरीदाबाद रस्त्यावर अल्टो कारची डंपरला धडक बसली. कारमधील सर्व 6 जणांचा मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला. कारमधील सर्व तरुण मित्र होते, ज्यांचे वय 24 ते 30 वर्षांच्या दरम्यान होते. सर्व मृत हरियाणातील पलवल जिल्ह्यातील रहिवासी असून ते आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुग्रामला गेले होते. रात्री उशिरा तेथून परतत असताना गुरुग्राम फरीदाबाद रस्त्यावरील पाली गावाजवळ हा अपघात झाला.

पानिपतमध्ये 3 महिलांचा मृत्यू - दुसरीकडे पानिपतमध्ये शुक्रवारी सकाळी एका ट्रकने भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. अपघातानंतर ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाली, यात 3 महिलांचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले. ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक देऊन ट्रकचालक तेथून पळून गेला. राष्ट्रीय महामार्ग 44 वर झाटीपूर गावाजवळ हा अपघात झाला. हे भक्त पानिपत येथील चुलकाना धाम येथून खाटू श्याम बाबाचे दर्शन घेऊन परतत होते, असे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर आसपासच्या लोकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे गंभीर जखमींना रेफर करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.