ETV Bharat / bharat

काँग्रेसचे रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री; कधी होणार शपथविधी? - भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बंडी संजय कुमार

Revanth Reddy Telangana New CM : तेलंगणात बीआरएस पक्षाला पराभवाचा धक्का बसलाय. त्याचवेळी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रेवंत रेड्डी
रेवंत रेड्डी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 10:16 AM IST

हैदराबाद Revanth Reddy Telangana New CM : तेलंगणा विधानसभा निवडणूकीची मतमोजणी पूर्ण झालीय. राज्यातील बीआरएस सरकारची सत्तेतून हकालपट्टी करण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 64 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी बीआरएसच्या खात्यात 39 जागा आल्या आहेत. भारतीय जनता पक्षानं 8 जागा काबीज केल्या आहेत. त्याचवेळी उर्वरित जागांवर अन्य उमेदवार विजयी झाले आहेत. पक्षाच्या पराभवानंतर सीएम केसीआर यांनी रात्री उशिरा राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

कधी होणार शपथविधी : आता तेलंगणा राज्यात कॉंग्रेसच सरकार स्थापन होणार आहे. या संदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं रविवारी रात्री उशिरा राज्यपाल तामिळीसाई यांची भेट घेत सरकार स्थापनेबाबत चर्चा केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार आहे. त्यात पक्ष विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज किंवा 9 डिसेंबर रोजी एलबी स्टेडियमवर शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. शेजारच्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा निरीक्षक डी. के. शिवकुमार, एआयसीसी राज्य निरीक्षक दीपदास मुन्शी, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यश्र रेवंत रेड्डी, खासदार उत्तम कुमार रेड्डी, माजी खासदार मल्लूरवी यांनी रविवारी रात्री निवडून आलेल्या आमदारांसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला.

कॉंग्रेसचे मोठे नेते शपथविधीला राहणार उपस्थित : आज राज्यपालांसह निवडणूक आयोगाचे सीईओ विजयी आमदारांची यादी सादर करणार आहेत. सध्याची विधानसभा रद्द करण्याच्या राज्यपालांच्या अधिसूचनेनंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री एकटेच शपथ घेणार की आणखी कोणी, हे आज कळेल. काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे प्रमुख नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ग्रेटर हैदराबादमध्ये काँग्रेसला एकही जागा नाही : विशेष म्हणजे 24 जागांच्या ग्रेटर हैदराबादमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. तिथं बीआरएसनं 16 जागा जिंकल्या आहेत. तर विधानसभा निवडणुकीतही भाजपानं तीन खासदार उभे केले होते, मात्र तिघेही निवडणुकीत पराभूत झाले. यात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बंडी संजय कुमार, अरविंद धर्मपुरी आणि सोयम बापूराव यांचा समावेश. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं एक जागा तर पोटनिवडणुकीत दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळं या निवडणुकीत तीन आमदार होते ते आता आठ झाले आहेत. मात्र त्यांचे दोन विद्यमान आमदार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. हे दोन्हीही आमदार पोटनिवडणुकीत दोघेही विजयी झाले होते.

हेही वाचा :

  1. 'लाडली'मुळं मध्य प्रदेशात पुन्हा एकदा शिव'राज'; पाचव्यांदा भाजपानं कशी मिळविली सत्ता?
  2. तेलंगाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; 'बीआरएस'च्या कारला लागला ब्रेक, भाजपाचाही वाढला आकडा
  3. राजस्थानात कमळ फुललं! काँग्रेसचा दारुण पराभव; अनेक दिग्गजही पराभूत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.