नवी दिल्ली : ममता बॅनर्जी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठनेते शरद पवार यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी राहूल गांधी आणि काॅंग्रेसवर मोठी टीका केली. त्यावर बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार करताना पवारांचा आम्ही आदर करतो असे म्हणले आहे.
त्यांना यूपीए माहित नाही का?
यूपीए म्हणजे काय हे ममता बॅनर्जी यांना माहीत नाही का असा प्रश्न करत त्यांनी म्हणले आहे की, मला वाटते त्यांना वेड लागले आहे. ममतांना असे वाटते संपू्र्ण भारत 'ममता ममता' करत आहे. पण बंगाल म्हणजे भारत नाही. बंगालमधे झालेल्याा निवडणुकीतील त्यांचे डावपेच हळूहळू उघड होत आहेत.
जातीय ध्रुवीकरणाचा खेळ
पश्चिमबंगाल मधे ममता आणि भाजप दोघांनी मिळुन जातीय ध्रुवीकरणाचा राजकीय खेळ खेळला. एनआरसीबाबत भाजपने आपली भुमिका बदलली, ती मतदाना नंतर संपली. एनआरसीची भीती दाखवून त्यांना निवडणुकीत फायदा मिळवायचा होता. त्यामुळे ममता म्हणतील त्याच्याशी भाजप सहमत होते
मिले सुर मेरा तुम्हारा
मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा ही ममता बॅनर्जी यांची भाजपला खूश ठेवण्याची भुमिका आहे. यूपीए सरकारमध्ये टीएमसीचे 6 मंत्री होते. 2012 मध्ये ममतांनी यूपीएचा पाठिंबा काढून घेण्यासाठी काही ना काही कारणे दाखवली होती. त्यांना त्यावेळी यूपीए सरकार पाडायचे होते. पण त्यावेळी त्यांना यश आले नाही. आज मोदींमुळेच त्यांची ताकद वाढली आहे.
त्यातर ऑक्सिजन पुरवठादार
जेव्हा भाजप संपूर्ण भारतात संघर्ष करत आहे. त्यांची परस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या ऑक्सिजन पुरवठादार झाल्या आहेत. त्यामुळे भाजप त्यांच्यावर खुश आहे. असेही चौधरी यांनी म्हणले आहे.