ETV Bharat / bharat

Removal of 'thali' by wife is mental cruelty: पत्नीने मंगळसूत्र काढणे ही तर मानसिक क्रौर्याची परिसीमा - उच्च न्यायालय

author img

By

Published : Jul 15, 2022, 12:06 PM IST

विभक्त राहणाऱ्या पत्नीने मंगळसूत्र काढले तर ते मोठे मानसिक क्रौर्य मानले जाईल. घटस्फोटाशी संबंधित एका प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. सोबतच या आधारे पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे (Removal of thali is mental cruelty).

पत्नीने मंगळसूत्र काढणे ही तर मानसिक क्रौर्याची परिसीमा

चेन्नई: पत्नीने वेगळे राहात असताना मंगळसूत्र काढून टाकणे ही एकप्रकरची पतीबरोबरची मानसिक क्रुरता आहे, असे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यानुसार पीडित पुरुषाला कोर्टाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे. अलीकडेच इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांच्या अपीलला परवानगी देताना मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठातील व्ही एम वेलुमणी आणि एस सौंथर यांनी हे निरीक्षण नोंदवले (Madras High court). घटस्फोटास नकार देण्याच्या स्थानिक कौटुंबिक न्यायालयाच्या १५ जून २०१६ च्या आदेशाविरोधात याबाबत अपील केले होते.

मंगळसूत्र काढल्याची कबुली - जेव्हा त्या महिलेची तपासणी करण्यात आली तेव्हा तिने कबूल केले की विभक्त होण्याच्यावेळी तिने तिचे मंगळसूत्र (थाली साखळी) काढून टाकले. त्याचवेळी फक्त साखळी काढली पदक मात्र ठेवले असे स्पष्टीकरण दिले. त्यावर कोर्टाचे समाधान झाले नाही. साखळी काढणे हेही तितकेच महत्वाचे असल्याचे कोर्टाने नमूद केले. तिच्या वकिलांनी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 7 चा संदर्भ देऊन असे मांडले की थाली बांधणे आवश्यक नाही. म्हणून ती काढून टाकली. त्याचा वैवाहिक नातेसंबंधावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु न्यायालयाने, विवाह सोहळ्यांमध्ये थाळी बांधणे हा एक अनिवार्य विधी आहे, ही सर्वसामान्य गोष्ट आहे, हे निदर्शनास आणून दिले.

निकालाचा हवाला - न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशाचाही हवाला दिला, ज्यात असे म्हटले आहे की "रेकॉर्डवर उपलब्ध असलेल्या सामग्रीवरून असे देखील दिसून येते की याचिकाकर्त्याने थाळी काढली आहे आणि त्याचीदेखील कबुली दिली आहे. तिने ती बँक लॉकरमध्ये ठेवली होती. कोणतीही हिंदू विवाहित स्त्री तिच्या पतीच्या हयातीत कोणत्याहीवेळी थाळी काढणार नाही हे सर्वज्ञात सत्य आहे." स्त्रीच्या गळ्यातील थाळी ही एक पवित्र वस्तू होती जी विवाहाचे प्रतीक आहे. ती पतीच्या मृत्यूनंतरच काढली जाते. त्यामुळे पत्नीने ती काढून टाकणे ही सर्वोच्च मानसिक क्रूरता दर्शवणारी कृती आहे असे म्हणता येईल. कारण त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात," असे खंडपीठाने म्हटले होते.

हेही वाचा - Verdict on mohammad zubair bail: मोहम्मद जुबेरच्या जामीन अर्जावर आज निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.