ETV Bharat / bharat

ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून करणार प्रचार; रूग्णालयातून ममता बॅनर्जींनी जारी केला व्हिडीओ - ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून करणार प्रचार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक व्हिडिओ जारी करत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मतदारसंघ नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचार करत असताना ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, त्यांनी हार न मानता विधानसभेच्या रणांगणात विरोधकांना भिडण्याचा निर्धार केला आहे.

अमरावती
अमरावती
author img

By

Published : Mar 12, 2021, 11:08 AM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कोलकाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून त्यांनी एक व्हिडिओ जारी करत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच आपण व्हिलचेअरवरून प्रचार करणार असल्याचंही त्यांनी व्हिडीओद्वारे सांगितले. मतदारसंघ नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचार करत असताना ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, त्यांनी हार न मानता विधानसभेच्या रणांगणात विरोधकांना भिडण्याचा निर्धार केला आहे.

रूग्णालयातून ममता बॅनर्जींनी जारी केला व्हिडीओ

एसएसकेएम रुग्णालयाने ममता बॅनर्जी यांचे हेल्थ बुलेटीन जारी केले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. दुखणे असताना, मॅनेज करून व्हिलचेअरवरून प्रचार करणार असल्याचे दीदींनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात खरी लढत ही भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये आहे.

नेमकं काय झाले?

ममता बॅनर्जी नंदीग्रामध्ये प्रचारासाठी पोहचल्या होत्या. एका मंदिरातून दर्शन घेत, ममता बॅनर्जी गाडीमध्ये बसत असताना चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डाव्या पायाला, उजव्या खांद्याला आणि मानेला दुखापत झाली आहे. या हल्ल्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप तृणमूलच्या नेत्यांनी केला आहे.

दीदींवरील हल्ल्याचे भाजप कनेक्शन -

तृणमूलतर्फे खासदार डेरेक ओब्रायन, राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि पार्थ चॅटर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. ९ मार्चला निवडणूक आयोगाने डीजीपींना बदलण्याचे आदेश दिले. दहा मार्चला एका भाजपा नेत्याने 'संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तुम्हाला कळेल की काय होणार आहे' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ममतांवर हल्ला झाला. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. सत्य लवकरात लवकर बाहेर यावे अशी आमची मागणी आहे, असे माध्यमांशी बोलताना डेरेक ओब्रायन म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.