ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर - कोरोना

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 28, 2021, 6:30 AM IST

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्र राज्यातही आढळत आहे. यामुळे आजपासून राज्यभर कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला दुपारी 4 वाजेपर्यंतच 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून शनिवार-रविवारी दोन दिवस रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बंद राहतील. सार्वजनिक स्थळे सकाळी 5 ते 9 पर्यंतच सुरू राहणार आहेत. सायंकाळी पाच वाजेनंतर राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू होणार आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे. आवश्यक यंत्रणा सुविधांसह सज्ज ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणून मालाड येथे २ हजार १७० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये १ हजार ५५० ऑक्सिजन बेड, १९० आयसीयू आणि पेडियाट्रिक वॉर्डमध्ये २५० बेड उपलब्ध असणार आहेत. या जम्बो कोविड सेंटरचे सोमवारी (दि. 28 जून) लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्त होणार आहे.

मालाड येथील कोविड सेंटर
मालाड येथील कोविड सेंटर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कलानगर जंक्शन येथील बीकेसी उड्डाणपुलाजवळील सी लिंकचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार रामदास आठवले, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, मुंबई महापालिकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेते उपस्थित असतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई महानगरपालिकेत दुपारी अडीच वाजता मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी महापालिका निवडणूकीबाबत बोलण्याची शक्यता आहे.

भाई जगताप
भाई जगताप

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात बीड जिल्हाधिकाऱ्याधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करणार आहेत.

आमदार सुरेश धस
आमदार सुरेश धस

राज्यात मान्सून दाखल झाला असून आज कोकण, मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरण होणार आहे. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मेपासून 18 ते 44 वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. राज्यात लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक वेळा लसीकरण ठप्प झाले आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 9 लाख 79 हजार 460 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

एमपीएससी आयोगाच्या मनमानी आणि दडपशाही निर्णया विरोधात आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पूनम गेट येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करणार आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या लोकसभा मतदार संघ वाराणसी येथे एक दिवसीय दोऱ्यावर आहेत. ते सायंकाळी चार वाजता वाराणसी विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर काशी हिंदू विद्यापीठाच्या ट्रामा सेंटरचे उद्घाटन साडेचार वाजण्याच्या सुमारास करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.