मुख्यमंत्री रत्नागिरीच्या दौऱ्यावर येणार आहेत. चिपळूणमधील पूरस्थितीची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत.
फ्लिपकार्टची बिग सेव्हिंग्ज डेचा आजपासून सुरुवात होणार आहे. हा सेल 29 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
भाजपच्या विधिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
पंढरपुरात (Pandharpur) आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे (Covid-19) निर्बंध घालण्यात आले आहेत. पंढरपूरसह परिसरातील नऊ गावांमध्ये 17 जुलै ते 25 जुलैपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या संचारबंदीचा शेवटचा दिवस आहे.
बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपट 'शेरशहा' बटालियनची कमान सांभाळायला आणि नेतृत्व करायला पूर्णपणे सज्ज आहे. अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर 25 जुलैला प्रदर्शित होणार आहे.
पुण्यातील सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने महिला सैन्य पोलिसपदाच्या जनरल ड्यूटी भरतीसाठी एकत्रित प्रवेश परीक्षेचे (सीईई) (CEE) आयोजन केले आहे. ही परीक्षा येत्या २५ जुलै रोजी पुणे कॅन्टोन्मेंट येथील मिल्खासिंग क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे.
हवामान विभागाने गुजरातमधील काही भागांमध्ये 25 जुलैला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
जालना ते बदनापूर सेक्शन मधील दिनेगाव रेल्वे स्थानकावर दिनांक 25 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान 15 दिवस दुपारी 3.30 ते 6.30 वाजेपर्यंत रोज 3 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे.
कोल्हापुरात आता पावसाने उघडीप घेतली आहे. मात्र, हवामान विभागाने कोल्हापूरसाठी 25 जुल साठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कर्नाटक सरकारनं करोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. 25 जुलैपासून करोनाचे नियम पाळत राज्यातील धार्मिक स्थळाजवळील व्यवहार आणि मनोरंजन पार्क उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.