मुंबई : इंधनाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीवर अवलंबून (petrol diesel rates today) असतात. कारण, आपण बहुतांश इंधन हे आयात करतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल 61 डॉलर प्रती बॅरल पर्यंतवर गेले आहे. त्यामुळे देशात इंधनाच्या किमती वाढत आहेत. इंधनावरच्या करांबद्दल म्हणाल तर केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारं इंधनावर कर लावत असतात. आणि करातून सरकारांना महसूल मिळतो. विकासाची गरज लक्षात घेऊन हे कर लावले जातात. जेव्हा गरज वाटली तेव्हा दरवेळी केंद्राने इंधनावरील एक्साईज ड्युटी कमी केली ( petrol diesel rates today 29 December 2022 ) आहे.
इंधनाचे दर नियंत्रित : तेल किंवा इंधनाचे दर नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग सरकारकडे ( Diesel Rates Today) आहे, तो म्हणजे तेल कंपन्या रिटेल व्यावसायिकांना देत असलेला दर नियंत्रित करणे. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या (Petrol Diesel Rates Today in Maharashtra) आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 36 पैसे, तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 53 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 03 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 25 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 76 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 96 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 48 पैसे (Petrol Diesel Rates in Maharashtra) आहे.
इंधन किंमत : तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडते तेव्हा त्याची मूळ किंमत नक्की केली जाते. इंधनाची ही मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो. या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवली जाते. सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल केला (Petrol Rates Today) जातो.