मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आज स्थिर आहे. भारतातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने केव्हाच आता 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात
इंधनाच्या किमती : अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी इत्यादी. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती (Petrol Diesel Rates in Maharashtra) वाढतात. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rates Today) जाणून घ्या.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा दर 94 रुपये 31 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 77 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 106 रुपये 98 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 50 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 01 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 53 पैसे आहे.