अहमदाबाद - दिवा लावल्यानंतर अचानक उंदराने दिवा ओढला आणि धावू लागला. यानंतर घरातील कपड्यांसह संपूर्ण घराला आग लागली. आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. यासह दोन लाख रुपयांची रोकडही जळून खाक झाली आहे. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग विझवली.
स्थानिकांनी केले आग विझवण्याचे प्रयत्न - स्थानिक लोकांनी पाईपद्वारे पाण्याची मोटार चालवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, आग आटोक्यात न आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. ही घटना अहमदाबादमधील हटकेश्वर भागातील एएमटीएस बस स्थानकामागील कर्मभूमी सोसायटीत राहणारे व्यापारी विनोदभाई यांच्या घराला बुधवारी सकाळी १० घडली.
उंदराने दिव्याने संपुर्ण घराला लावली आग - व्यापारी विनोदभाई यांच्या म्हणण्यानुसार, चैत्र नवरात्रीमुळे त्यांनी घरात दिवा लावला. त्यानंतर उंदराने पेटलेला दिवा ओढताच संपूर्ण घराला आग लागली. घराला आग लागल्याने घरात ठेवलेले दोन लाख रुपयेही जळून खाक झाले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. स्थानिक लोकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - Fit Maharashtra : नियमित व्यायाम करा, तरच निरोगी महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल - उपमुख्यमंत्री अजित पवार