पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. पर्यटकांची पहिली पसंती असलेली रामोजी फिल्म सिटी १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. कोव्हिड आणि लॉकडाऊन यानंतर काही काळ आम्ही पर्यटकांचे मनोरंजन करू शकलो नाही. पण आता कोव्हिड संदर्भातील सर्व खबरदारी घेत पर्यटकांना सहलीचा पुरेपूर आनंद घेता येणार आहे.
तब्बल 2000 एकरांवर पसरलेली ही सिने-जादूची चित्तथरारक अद्भूत नगरी आहे. आकर्षक गार्डन, रंगीबेरंगी कारंजे यासह सृजनात्मक असे विविधांगी मनोरंजन याठिकाणी मिळणार आहे.
जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली रामोजी फिल्म सिटी देशातील एक निराळे मनोरंजन आणि पर्यटनाचे ठिकाण आहे. येथील व्यापक सुविधांना तांत्रिक, वास्तूकला आणि आखीव-रेखीव रचनेची जोड मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांद्वारे ही रचना करण्यात आली आहे.
रामोजी फिल्म सिटी हे अनेक चित्रपटांच्या शूटिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सर्वसमावेशक चित्रपट निर्मितीच्या पायाभूत आणि व्यावसायिक सेवा येथे एकत्रितपणे दिल्या गेल्या आहेत. पूर्ण आणि विनातणाव चित्रपटनिर्मितीचा अनुभव येथे घेता येतो. शूटिंगदरम्यान हव्या असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध असून एकाचवेळी अनेक चित्रपटांचे शूटिंग करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे.
रामोजी मुव्ही मॅजिक -
रामोजी मुव्ही मॅजिकद्वारे फिल्म आणि फॅन्टसी याची ओळख करून दिली जाते. चित्रपट निर्मितीतील गुंतागुंत, स्पेशल इफेक्ट, एडिटिंग, डबिंग आदींची ओळख करून दिली जाते.
- फिल्मी दुनिया - कल्पनाविश्वातील सैर यात घडवली जाते.
- रामोजी स्पेस यात्रा - अवकाशातील सैर घेण्याचा आनंद यात मिळतो. इथे तुम्ही अंतराळ यानात बसून आकाशगंगेची सफर करु शकता. चित्रपट निर्मितीमधील अॅक्शनचा स्वतः अनुभव घेता येतो. या संवादात्मक शोमधून तुम्हाला चित्रपट निर्मितीच्या उत्तम टिप्स मिळतात. येथील 'फिल्मी दुनिया' मध्ये तुम्ही कल्पनारम्य डार्क राईडचा अनुभव घेता येतो. अल्लादीनचा राजवाडा आणि तेथील चमत्कारी विश्व पाहून तुम्ही आश्चर्यचिकत होतो.
लाइव्ह शो -
विविधरंगी लाइव्ह शो हे रामोजी फिल्म सिटीचे आकर्षण आहे. देशातील सांस्कृतिक वैविध्य कलाकार आपल्या सादरीकरणातून दर्शवितात. ६०च्या दशकातील हॉलिवूड काऊबॉयप्रमाणे वाइल्ड वेस्ट स्टंट शो पाहायला मिळतात. तर बॅकलाइट शोच्या माध्यमातून प्रतिभाशाली कलाकारांचे परफॉर्मन्स अॅनिमेशन स्वरूपात दाखवले जातात. रामोजी फिल्म सिटीमधील रंगीबेरंगी मनोरंजनाच्या विविधांगी कार्यक्रमांचा अनुभव घेता येतो. इथले अद्भुत लय आणि तालबद्ध नृत्याचे लाईव्ह शो पाहताना तुमचेही पाय आपोआप थिरकतात. थरारक वाइल्ड वेस्ट शो आणि अनोख्या पोषाखातील ब्लॅकलाइट शो यांचा अनोखा संगम तुम्हाला अद्भुत असा अनुभव देतो.
गाइडेड टूर -
रामोजी फिल्म सिटी पाहताना पर्यटकांसाठी विशेष कोच प्रदान करणारी ही सुविधा आहे. चित्रपटांचे सेट्स, ठिकाणे, विविध गार्डन्स आदी सुविधांचे हो कोच पर्यटकांसाठी विशेष आहेत. सिनेमाची जादू, विविध रुपकात्मक आकर्षणे, करमणूक, राईड, गेम्स, लाइव्ह शो, मुलांसाठी खास आकर्षणे, इको टूर याचा अनुभव यात घेता येतो. यावेळी असंख्य विदेशी प्रजाती असलेल्या अकल्पित फुलपाखरु उद्यानाला नक्की भेट द्या.
विंग बर्ड पार्क -
पंख - जगातील विविध प्रकारचे पक्षी येथे पाहायला मिळतात. प्राकृतिक निवारा, हिरवी पाने, पिंजरे असा नजारा येथे दिसतो. पाण्यातील पक्षांचा विभाग, पिंजऱ्यातील पक्षांचा विभाग, मोकळ्या हवेतील पक्षांचा विभाग आणि शहामृग असे ४ विभाग दिसून येतात. येथील हिरव्यागार छतखाली वसलेल्या 'बर्ड पार्क'मध्ये विविध खंडातील लक्षवेधी पक्षी आपल्याला पाहायला मिळतील.
साहस - रामोजी अॅडव्हेंचर लॅण्ड -
विविध वयोगटातील पर्यटकांना साहसी अनुभव देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. साहसमध्ये हाय रोप कोर्स, नेट कोर्स, एटीव्ही राइड्स, माउंटेन बाइक, पेन्टबॉल, टार्गेट शूटिंग आदी क्रीडाप्रकार सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून समाविष्ट केली गेली आहेत. याचा आनंद केवळ तरूणच नाही, तर सहकुटुंब, विविध ग्रुप्स, शाळा-कॉलेज, कॉर्पोरेट्स सर्वच जण घेऊ शकतात. 'साहस'मध्ये खराखुरा थरार अनुभवता येतो. 'साहस'ला भेट म्हणजे आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट साहसी अनुभव. सर्वच वयोगटासाठी मनोरंजनासह साहसाचा अनुभव देणाऱ्या अनेक गोष्टी येथे उपलब्ध आहेत.
राहण्याची व्यवस्था -
रामोजी फिल्म सिटी संपूर्ण अनुभवण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही. प्रत्येक आकर्षणाला तुम्हाला बराच अवधी द्यावा लागेल. तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव निराळाच. प्रत्येकाला अनुरूप आणि माफक दरात राहण्याची पॅकेजेस येथे उपलब्ध आहेत. रामोजी फिल्म सिटीमधील हॉटेलमध्ये लक्झरी हॉटेल सितारा, सेमी-लक्झरी हॉटेल तारा, वसुंधरा व्हिला फार्म हाऊस यासह शांतीनिकेतन, सहारा आणि ग्रीन्स इनमध्ये सुपर इकॉनॉमी शयनगृहे आहेत. प्रत्येकजण त्यांच्या सोयीनुसार हे पॅकेज निवडू शकतो.
कोव्हिड-१९ विषयीची खबरदारी -
स्वच्छता आणि सुरक्षिततेला येथे प्राथमिकता देण्यात आली आहे. सर्व ठिकाणी कोविड-१९ साठीच्या सुरक्षा खबरदारीसह पर्यटकांसाठी ही सुरक्षित सहल असेल. स्वच्छता आणि सुरक्षेसाठीचे काटेकोर पालन येथे करण्यात येते. योग्य सोशल अंतर राहील याची खबरदारी घेतली जाते. सोशल संपर्कात येणाऱ्या सर्व साधनांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जाते. सुरक्षा प्रक्रियेचे प्रशिक्षण असलेले कर्मचारी पर्यटकांना मार्गदर्शन करतात.
अधिक माहितीसाठी ramojifilmcity.com वर किंवा टोल फ्री क्रमांक 1800 120 2999वर संपर्क करा.