नवी दिल्ली : भारतात उद्यापासून पवित्र रमजान महिन्याचा रोजा (उपवास) सुरू होणार आहे. देशाच्या अनेक भागात रमजानचा चंद्र दिसला ( Ramadan 2022 Moon sighted in India ) आहे. दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनी रमजानचा चंद्र दिसल्याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, देशाच्या विविध भागात रमजानचा चंद्र दिसला असून, रविवारी पहिला उपवास ( Ramadan India Fasting Begins Tomorrow ) असेल.
रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे. या पवित्र महिन्यात जगभरातील मुस्लिम उपवास करतात आणि नमाज अदा करतात. अरब देशांमध्ये शुक्रवारी रमजानचा सण साजरा करण्यात आला. भारतात आज चंद्र दिसला असून, उद्यापासून म्हणजेच ३ एप्रिलपासून उपवास सुरू होणार आहे.
-
#WATCH | People offer evening prayers as they await to see a glimpse of moon in Lucknow, Uttar Pradesh, on the beginning of the month of #Ramadan pic.twitter.com/VkoirwkBSa
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | People offer evening prayers as they await to see a glimpse of moon in Lucknow, Uttar Pradesh, on the beginning of the month of #Ramadan pic.twitter.com/VkoirwkBSa
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 2, 2022#WATCH | People offer evening prayers as they await to see a glimpse of moon in Lucknow, Uttar Pradesh, on the beginning of the month of #Ramadan pic.twitter.com/VkoirwkBSa
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 2, 2022
रमजानची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते. उपवास हे इस्लामच्या महत्त्वाच्या कर्तव्यांपैकी एक आहे. उपवास करणे हे प्रत्येक प्रौढ मुस्लिमाचे कर्तव्य आहे. महिनाभर रोजा (उपवास) ठेवला जातो आणि पाचही वेळा नमाज अदा केली जाते. उपवास ठेवण्यासाठी, सहरी सकाळच्या अजानच्या आधी खाल्ली जाते आणि इफ्तार मगरीबनंतर म्हणजेच संध्याकाळच्या अजाननंतर केली जाते.