अयोध्या Ram Temple Ayodhya : राम मंदिराचं उद्घाटन सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात बसवण्यात येणारी प्रभू श्रीरामांची मूर्ती निवडण्यात आली आहे. कर्नाटकमधील म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली श्री रामांची मूर्ती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला आवडली आहे. सोमवारी या मूर्तीबाबत ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी प्रसार माध्यमांना याबाबतची माहिती दिली.
डोळ्याचं पारणं फेडणारी मनमोहक मूर्ती : कर्नाटकचे मूर्तीकार अरुण योगीराज यांनी बनवलेली ही मूर्ती मोठी आकर्षक असून डोळ्याची पारणं फेडणारी आकर्षक मूर्ती आहे. याबाबत बोलताना चंपत राय यांनी सांगितलं की, "अरुण योगीराज यांचं कुटुंब अनेक वर्षांपासून मूर्ती बनवण्याचं काम करत आहे. त्यांनी देशातील अनेक सुंदर मूर्ती तयार केल्या आहेत. अयोध्येतील राम मंदिरात बसवण्यात येणारी प्रभू श्रीरामाची बालस्वरूपातील 51 इंची मूर्ती त्यांनी बनवलेली आहे. ही मूर्ती अतिशय भव्य आणि सुंदर आहे. पाच वर्षाच्या प्रभू श्रीरामाची ही मूर्ती मोठी आकर्षक आहे. प्रभू श्रीरामांच्या या मूर्तीची 18 जानेवारीला दुपारी गर्भगृहात प्रतिष्ठापना केली जाणार आहे. रामजन्मभूमी संकुलात पूजन होत असलेल्या मूर्तीलाही या ठिकाणी स्थान देण्यात येणार आहे. नव्यानं बनवलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं वजन 150 ते 200 किलो आहे."
रामजन्मभूमी संकुलातच होणार धार्मिक विधी : "अयोध्येतील राम जन्मभूमी परिसरात धार्मिक विधी पार पडमार आहेत. प्राणप्रतिष्ठापनेशी निगडीत असलेले कार्यक्रम रामजन्मभूमी संकुलात करण्यात येतील. देशभरातून निवडण्यात आलेले 120 वैदीक महंत हा विधी संपन्न करणार आहेत. या सर्व पावन विधींसाठी 9 यज्ञकुंड तयार करण्यात आले आहेत. काशीचे महंत गणेश्वर शास्त्री द्रविड आणि पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी पूर्ण केले जाणार आहेत. प्राणप्रतिष्ठापनेची सगळी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे." असंही चंपत राय यांनी स्पष्ट केलं आहे.
भाविकांना 20 जानेवारीपासून दर्शन राहणार बंद : "मंदिर परिसरात अनेक धार्मिक विधी केले जाणार आहेत. त्यामुळं 20 जानेवारीपासून भाविकांना दर्शन बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे. भाविकांच्या गर्दीमुळे गोंधळ होण्याची शक्यता असल्यानं 20 ते 21 जानेवारीला दर्शन बंद ठेवण्याचा विचार सुरू आहे. रामभक्तांना 23 जानेवारीपासून अयोध्येत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भाविकांना दिवसभर दर्शन सुरू ठेऊन संध्याकाळपर्यंत निरोप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. खूप थंडी असल्यानं त्यांना इथं अडचणींचा सामना करावा लागू शकतो." असही चंपत राय यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आजपासून धार्मिक विधींना सुरुवात
16 जानेवारी - प्रायश्चित्त आणि कर्मकूटि पूजन
17 जानेवारी - मूर्तिचा परिसर प्रवेश
18 जानेवारी : तीर्थ पूजन, जल यात्रा, गंधाधिवास
19 जानेवारी : औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास
19 जानेवारी : धान्याधिवास
20 जानेवारी : शर्कराधिवास, फलाधिवास
20 जानेवारी : पुष्पाधिवास
21 जानेवारी : मध्याधिवास
21 जानेवारी : शय्याधिवास
हेही वाचा :