कोलकाता (पश्चिम बंगाल) Mamata Banerjee : लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन करून भाजपा एकप्रकारची 'नौटंकी' करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय. तसेच, काही निवडक समुहांना दूर ठेवणाऱ्या या सोहळ्याचं आपण समर्थन करत नाहीत. तसेच, धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्यावर माझा विश्वास नाही, असंही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्यात. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रीय सण जाहीर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्याधाममधील श्री रामच्या बहुप्रतिक्षित मूर्तीच्या अभिषेक सोहळ्याशी सर्वसामान्यांचा भावनिक संबंध लक्षात घेऊन, 22 जानेवारी रोजी राज्यातील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या विशेष सोहळ्याला 'राष्ट्रीय सण' म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 22 जानेवारी रोजी राज्यातील दारूची दुकाने, मांस विक्रीही बंद ठेवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
अयोध्येत होणार मोठे बदल : अयोध्येत पुरेसे हॉटेल आणि धर्मशाळा आहेत. होम स्टेची व्यवस्थाही उपलब्ध आहे. अयोध्येत आता टेंट सिटींची संख्या वाढवण्याची गरज आहे. अयोध्येत 25-50 एकरमध्ये भव्य टेंट सिटी तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. पुढं मुख्यमंत्री म्हणाले की, 22 जानेवारीनंतर जगभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होतील. त्यांच्या सोयीसाठी संपूर्ण शहरात विविध भाषांमधील साईनबोर्ड लावावेत. तसंच सर्व सोयी रामभक्तांना मिळाव्यात.
अयोध्यानगरी सजली : रामनगरी अयोध्येमध्ये २२ जानेवारीला श्री राम प्रभूचा अभिषेक सोहळा होतोय. त्या सोहळ्यामुळे देशात सर्वत्र भक्तीय वातावरण झाल्याचं पाहायला मिळतंय. सध्या अयोध्येत सर्वच कामाची जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्या नगरी आतापासूनच सजली आहे. राम भक्तांसाठी ट्रस्टनं प्रसिद्ध केलेल्या मंदिराच्या ताज्या छायाचित्रांमध्ये सिंहांच्या चित्राचाही समावेश आहे. याशिवाय राम मंदिराच्या गेटवरच रामभक्त हनुमान आणि गरुड यांच्या मूर्ती लावण्यात आल्यात. मंदिरात प्रवेश करणाऱ्या राम भक्तांना महाबली हनुमान आणि गरुड यांची परवानगी घेऊन नव्यानं बांधलेल्या मंदिरात प्रवेश मिळेल.
हेही वाचा :
1 २२ जानेवारीला दक्षिण- मध्य मुंबईत लखलखणार एक लाख दिवे
2 दिव्यांग कारागिरांनी विणला अयोध्येच्या श्रीरामासाठी पैठणी शेला
3 अयोध्येचे निमंत्रण; काँग्रेसची, धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी अवस्था